आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव मंडळांना घेता येईल अाता अाॅनलाईन वीजजोडणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अनधिकृत वीजजोडणीमुळे सुरक्षितता धोक्यात येते, तसेच अपघातही होऊ शकतात. हे टाळण्यासाठी जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळानी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले असून, या जोडणीसाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध आहे.

गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. अशावेळी अनधिकृत वीजजोडणीमुळे अपघात होऊ शकतो. प्रसंगी जीवित व वित्तहानीही होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून नवीन वीजजोडणीकरिता ऑनलाइन अर्जसुद्धा दाखल करू शकतात. या अर्जासोबत नवीन वीजपुरवठ्याकरिता करावयाच्या अर्ज ए-१ प्रपत्र, स्थानिक पोिलस अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र व वीजजोडणीचा चाचणी अहवाल (टेस्ट रिपोर्ट) देणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पूर्तता व आवश्यक रकमेचा संपूर्ण भरणा केल्यानंतर तीन दविसांत वीजजोडणी मंजूर करण्यात येईल. जे मंडळ अधिकृत वीजजोडणी घेणार नाहीत, अशा मंडळाना महावितरणचे दामिनी पथक भेट देणार. या मंडळांना अपघात टाळण्याकरिता सुरक्षा व वीजचोरीच्या परिणामाबद्दलची जाणीव हे पथक करून देईल. हे पथक संबंधित मंडळाला अधिकृत वीजजोडणी घेण्याची विनंती करतील. मात्र, तरीही या मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली नाही, तर अशा मंडळांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.