आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नलच्या निविदांना ‘ग्रीन सिग्नल’, ३० जानेवारीपर्यंत निविदा दाखल करता येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ऑनलाइनबँकिंग सुरू झाल्यानंतरही रखडलेल्या सिग्नलच्या निविदा महापालिका प्रशासनाने अखेर प्रसिद्ध केल्या. ३० जानेवारीपर्यंत संबंधिताना निविदा दाखल करता येणार असून, ३१ जानेवारीला या निविदा उघडल्या जातील. त्यामुळे शहरातील प्रमुख दहा चौकांतील वाहतूक लवकरच सुरळीत होईल. "दिव्य मराठी'ने सिग्नल निविदांचा प्रश्न सातत्याने लावून धरला होता.

२६ कोटी निधीतून शहरातील एकूण १० महत्त्वाच्या चौकात सिग्नल दुरुस्तीसाठी ६५ लाख ९० हजार रुपये खर्च करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती. त्यामुळे शहरात १० ठिकाणी सिग्नल व्यवस्था सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आचारसंहिता संपुष्टात आली त्यानंतर विविध कारणांमुळे निविदा प्रक्रिया रखडली होती. ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू झाली. त्यामुळे निविदा प्रसिद्ध करता आल्या नाहीत. त्यामुळे शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायम होता. याबाबत नागरिाकंनी अनेकदा मागणीही केली होती. दिव्य मराठीच्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाने दहा चौकांत सिग्नल व्यवस्था सुरू करण्यासाठी ई-निविदा प्रसिद्ध केल्या. ३० जानेवारीपर्यंत संबंधितांना निविदा दाखल करता येणार असून, ३१ जानेवारीला या निविदा उघडल्या जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही पूर्ण झाल्यावर सिग्नल उभारण्याचे काम सुरू होईल.

वाहतुकीच्या कोंडीचा कायमचा प्रश्न सुटणार
आचारसंहितासंपुष्टात आल्यानंतर विविध कारणांमुळे निविदा प्रक्रिया रखडली, तर पुढे ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू झाल्याने निविदा प्रसिद्ध करता आल्या नाहीत. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांतील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायम होता. "दिव्य मराठी'ने हा विषय सातत्याने लावून धरला. आता हा प्रश्न सुटणार आहे.

या चौकात लागतील सिग्नल
*अग्रसेन चौक*रेल्वेस्थानकचौक*रतनलालप्लॉटचौक *शहरकोतवालीचौक *सिव्हिललाइनचौक *पोस्टऑफिसचौक *नेहरूपार्कचौक (दुरुस्ती) *जेलचौक(दुरुस्ती) *वाशीमबायपासचौक (दुरुस्ती) - हुतात्मा स्मारक चौक (दुरुस्ती)