आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव - प्रलंबित मागण्यांसाठी मॅग्मो संघटनेच्या वतीने 1 जुलैपासून कामबंद आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवार, 5 जुलै रोजी या आंदोलनाचा पाचवा दिवस होता. शनिवारी एनआरएचएमचे वैद्यकीय अधिकारीही संपात सहभागी झाल्याने शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाच्या रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे.
यापूर्वी विविध मागण्यांसाठी संघटनेने आंदोलन केले होते. मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी 1 जुलैची मुदत शासनाने दिली होती. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपात येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीही सहभागी झाले आहेत. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर झाला असून, रुग्णांची गैरसोय होत आहे.

संप लवकर मिटावा
आरोग्य सेवेवरील परिणाम लक्षात घेता शासनाने मार्ग काढावा. खासगी दवाखान्यात उपचार करणे परवडत नाही. त्यामुळे शासनाने यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

पदेही भरली नाहीत
येथील सामान्य रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ यांसह विविध तज्ज्ञांची पदे रिक्त आहे. त्यातच संप सुरु झाल्याने आरोग्य सेवा मिळण्यास अडचण होत आहे.

तीन वैद्यकीय अधिकारी कामावर
- तीन दिवसांपासून वैद्यकीय अधिका-यांचा संप सुरू आहे. या संपात एनआरएचएमच्या वैद्यकीय अधिका-यांनी सहभाग घेतल्याने आयुष आरोग्य योजनेतील तीन वैद्यकीय अधिका-यांवर रुग्णालय सुरू आहे.’’ डॉ. सुरेखा मेंढे, वैद्यकीय अधिकारी, खामगाव