आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेवीदारांना १९ लाख रुपये देण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भाईचंद हिराचंद रायसोनीच्या अकोला शाखेत ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठेवीदारांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने ठेवीदारांना १९ लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत.

बीएचआर मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी अकोला शाखेने शेकडो ठेवीदारांच्या ठेवी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ठेवीदारांनी सोसायटीच्या विरोधात भूमिका घेत पोलिसात तक्रारीही दिल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी संचालक मंडळावर गुन्हे दाखल केले होते. शासकीय दूध डेअरीजवळ राहणारे युवराज हिरामण दुधे यांनी ११ लाख ८२ हजार रुपयांच्या ठेवी सोसायटीमध्ये ठेवल्या होत्या. मात्र, त्या परत देण्यास टाळाटाळ झाल्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावला. याप्रकरणी १७ संचालकांच्या विरुद्ध निर्णय देत ग्राहक मंचाने बीएचआरला १३ लाख ३५ हजार ६६० रुपये आणि तक्रारकर्त्याला सहन कराव्या लागलेल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसान भरपाईपोटी पाच हजार रुपये प्रकरणाच्या खर्चापोटी तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत, तर दुस प्रकरणात सुभाष रूपचंद अग्रवाल यांनासुद्धा बीएचआरच्या संचालकांनी पाच लाख ९८ हजार ९७२ रुपये आणि शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसानभरपाईपोटी पाच हजार रुपये प्रकरणाच्या खर्चापोटी तीन हजार रुपये देण्याचे आदेश बजावले आहेत. बीएचआरने या दोन्ही ठेवीदारांना त्यांच्या ठेवी दंडाच्या रकमेसह ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत.