आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oscillation For National Monuments, Latest News In Divya Marathi

राष्ट्रीय स्मारकासाठी अकोल्‍यात आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अखिल भारतीय र्शी गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आर्शम प्रणित अखिल भारतीय र्शी गुरुदेव युवा संघटनेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची महासमाधी व गुरुकुंज आर्शम भारताचे राष्ट्रीय स्मारक व्हावे आणि संरक्षित क्षेत्र घोषित करावे, यासाठी 1 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात घोषणा, निदर्शने नव्हती, तर मंडळातील कार्यकर्त्यांनी तुकडोजी महाराजांची भजने म्हटली. यातून प्रशासनाचे लक्ष तर वेधले शिवाय गुरुदेवांचे विचार लोकांपर्यंत पोहचले.
तुकडोजी महाराजांची कर्मभूमी गुरुकुंज आर्शम हे त्यांनी स्वत: स्थापन केलेले असून, येथे त्यांची महासमाधी आहे. ही महासमाधी राष्ट्रभक्तीचे स्रोत व मानवतेचे प्रतीक आहे. भावी पिढीला राष्ट्रसंतांच्या राष्ट्रीय कार्याची व जागतिक शांतीसाठी त्यांनी उभारलेल्या सर्वधर्म समभाव व मानवतेच्या शांतीप्रिय वैचारिक आंदोलनाची जाणीव करून देणारे महाराजांची महासमाधी व गुरुकुंज आर्शम हे ऐतिहासिक प्रेरणा स्थळ आहे. राष्ट्रसंतांचे जीवनचरित्र व क्रांतिकारक मानवतावादी विचार भविष्यातील पिढीला मिळालेला बहुमूल्य वारसा आहे. तो जपण्यासाठी सकारात्मक पावले उचलली गेली पाहिजे. गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गुरुदेवांच्या ध्येयधोरणांचा प्रचार व प्रसार गावोगावी करतात. या मिशनला कुठल्याच प्रकारचा आधार नसताना केवळ गुरुदेवांकडून मिळालेल्या ऊज्रेने हे कार्य अविरत सुरू आहे.
त्यागमय जीवन जगणार्‍या गुरुदेवांच्या महासमाधीला अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराचे व त्यांच्या जीवन चरित्र्याचे मानवतेच्या व विश्वशांतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रचार, प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुकुंज आर्शम व महासमाधी या स्थळाला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, अशा मागण्या केल्या आहेत. त्यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष अँड. दिलीप कोहळे, अँड. संतोष भोरे, जिल्हाध्यक्ष प्रा. राजीव बोरकर, जिल्हा मार्गदर्शक रामेश्वर बरगट, डॉ. रवी येवले, भाई प्रदीप देशमुख, ज्ञानेवर साकरकर, उदय मुंडगावकर, प्रसाद बरगट, आकाश इंगळे, गोपाल इंगळे, नामदेवराव ठाकरे, भुजंगराव देशमुख, गोविंद देशमुख, सुरेश डोईफोडे, किशोर कुचके, तुषार बरगट, प्रशांत ठाकरे, स्वप्निल इंगोले, भाऊराव राऊत, र्शीपाद खेडकर, शिवा महल्ले, अभिजित गहुकर यांच्यासह मंडळातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.