आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटबंधारे विभागाच्या चालकाचा कार-कंटेनर अपघातामध्ये मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर- बुलडाणा येथील पाटबंधारे विभागाच्या अँम्बेसिडर कारला कंटेनरने धडक दिल्याने अँम्बेसिडर कारचा चालक ठार झाला. ही घटना शुक्रवार, 7 फेब्रुवारीला खामगाव-अकोला रोडवरील तरोडा फाटा येथे घडली़ बुलडाणा येथील पाटबंधारे विभागात कार्यरत संदीप गणपत अहिरे वय 35, रा. पाटबंधारे वसाहत, बुलडाणा हे आज पाटबंधारे विभागात कार्यरत कार्यकारी अभियंता विजय ढोले यांना शासकीय वाहन क्रमांक एमएच - 28- सी - 6310 ने अकोला येथे सोडून बुलडाण्याकडे येत होत़े दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर खामगाव ते अकोलादरम्यान तरोडा फाटा येथे कंटेनर क्रमांक एमएच - 28 -जीजे - 3060 ने कारला धडक दिल्याने चालक संदीप गणपत अहिरे हे गंभीर जखमी झाल़े या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पथकाचे ठाणेदार उत्तमराव शेरजे हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले, त्यांनी जखमी चालकास उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितल़े मृतक अहिरे यांच्या पश्चात पत्नी, आई व दोन मुले आहेत.