आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामपंचायत निवडणूक हरकती नोंदवण्यास जूनपासून सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३२ जिल्ह्यांमधील सुमारे आठ हजार ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
ग्रामपंचायत प्रभागनिहाय मतदार याद्यांवर ते जूनदरम्यान हरकती सूचना दाखल करता येणार आहेत. मतदार याद्यांचा कार्यक्रम विविध ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी देखील लागू आहे. यासाठी १८ मे रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या याद्यांवरून तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार याद्या जून २०१५ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर जून २०१५ पर्यंत हरकती सूचना दाखल करता येतील. १३ जून रोजी ग्रामपंचायत प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची यादी शासनाने घोषित केली आहे. यामध्ये अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील २२२, वाशीम १६३, यवतमाळ ४९४, बुलडाणा ५२३ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
याद्या पुनर्निरीक्षण
- निवडणूक विभागाच्या वतीने मतदार याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नाव दुरुस्ती, आधार कार्ड लिंक करणे आदी काम वेगाने सुरू आहे. तहसीलदारांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार कर्मचारी यासाठी प्रयत्न करत आहेत.''
संतोष शिंदे, तहसीलदार, अकोला.
बातम्या आणखी आहेत...