आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

28 गणांचे आरक्षण जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - डिसेंबर 2013 मध्ये जिल्हय़ातील पंचायत समित्यांच्या कार्यकाळाची मुदत संपत आहे. अकोला पंचायत समितीच्या 28 गणांसाठीच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी येथील तहसील कार्यालयात काढण्यात आली.

जिल्हा परिषदेचे अकोला तालुक्यात 14 गट आहेत, तर 28 पंचायत समितीचे गण आहेत. या 28 गणांमधून 14 गण महिलांसाठी जातीनिहाय राखीव सोडण्यात आले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी सात जागा, अनुसूचित जमाती दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग आठ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 11 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातींच्या सात जागांमधून महिलांसाठी चार जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जमातीच्या महिलेला एक, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चार आणि सर्वसाधारण जागांसाठी पाच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आहे. या आरक्षणाची सोडत उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी तहसीलदार राजेश्वर हांडे, परिविक्षाधीन अधिकारी योगेश देशमुख, संतोष इंगळे आदींची उपस्थिती होती.