आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूर मंदिर समिती बरखास्त करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तातडीने बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. या मागणीसाठी समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्य गृहाजवळ 4 ऑगस्टला दुपारी 1 वाजता आंदोलन केले. समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली.

या आंदोलनात हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक धीरज राऊत, सनातन संस्थेच्या मेघा वसंत जोशी, अखिल भारतीय गुजराथी समितीचे डॉ. प्रवीण चौहान आदी सहभागी झाले होते.

भ्रष्टाचाराचे आरोप
हिंदू विधिज्ञ परिषदेने माहिती अधिकारान्वये समितीने कागदपत्रे प्राप्त केली आहे. दागिन्यांच्या मोजमापनात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 2000 ते 2010 या काळात गोशाळेतील गोधन एक लाख 46 हजार रुपयांना विकले गेले. मंदिर समितीने पर्यटन विकास महामंडळाची इमारत आठ लाख रुपयांनी भाड्याने घेतली. त्यामुळे मंदिराला 47 लाख 97 हजार रुपयांचा तोटा झाल्याचा आरोपही समितीने केला आहे. यावेळी स्वाक्षरी अभियानही यावेळी राबविण्यात आले.