आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panjabrao Deshmukh Agriculture University Issue At Akola

प्रकल्पग्रस्तांच्‍या आंदोलनाची बैठकीनंतर ठरवणार भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हाधिकारी आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिवांशी केलेल्या चर्चेनंतर प्रकल्पग्रस्तांनी 26 जानेवारीला दिलेला आत्मदहनाचा इशारा स्थगित केला आहे. 29 जानेवारीनंतर मुंबईत आयोजित बैठकीनंतर पुढील आंदोलनाची भूमिका ठरवणार आहेत.

25 जानेवारीपर्यंत शासकीय सेवेत कायम करण्याचे आदेश न मिळाल्यास प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारीला सर्व प्रकल्पग्रस्त सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा कुलपती, महामहिम राज्यपालांना निवेदनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेत कृषी विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी प्रकल्पग्रस्तांना चर्चेसाठी बोलावले होते. 29 जानेवारीला कृषिमंत्र्यांसोबत होणार्‍या संयुक्त बैठकीत काहीतरी तोडगा निघेल, असे प्रभारी कुलगुरू विजय माहोरकर व कुलसचिव ज्ञानेश्वर भारती यांनी सांगितले. दुपारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी 30 जानेवारीला कृषी विद्यापीठ व प्रकल्पग्रस्तांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. या बैठकीत निर्णय घेणार आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आणि कुलसचिवांनी दिलेल्या आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्तांनी तूर्तास आत्मदहन करण्याचा निर्णय स्थगित केला आहे.

पदवीप्रदान समारंभात करणार आत्मदहन
26 जानेवारीची तारीख पुढे ढकलली असून, 5 फेब्रुवारीला विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात आत्मदहनाचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. शासन व कृषी विद्यापीठाने इच्छा मरणाची परवानगीच दिलेली आहे, असे समजून आम्ही 5 फेब्रुवारीला आत्मदहन करणार आहे.’’ राजेश मुरुमकार, कार्यकारी अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त संघटना.

या आहेत प्रमुख मागण्या
1) सर्व प्रकल्पग्रस्तांना एकाचवेळी शासकीय नियुक्ती आदेश द्यावेत.
2) 27 डिसेंबर 2013 रोजी केंद्र शासनाने पारित केलेला भू-संपादन कायदा महाराष्ट्र शासनाने लागू करावा.

बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता
मुंबईत 29 जानेवारीला कृषिमंत्र्यांनी बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.’’ ज्ञानेश्वर भारती, कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ