आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर वाहने उभी केल्यास गुन्हा, पोलिस प्रशासनाने उचलले पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वाहतुकीलािशस्त लागावी यासाठी पोलिस प्रशासनाने आता एक पाऊल पुढे उचलले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर वाहने उभी केल्यास आता १०० रुपयांच्या चालानवर भागणार नाही. कारण आता वाहनधारकावर गुन्हे दाखल करून वाहने न्यायालयातून सोडवून घ्यावी लागतील.
त्यामुळे वाहनधारकांनी आपली वाहने वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत, अशी पार्किंग केल्यास कारवाई टाळता येणार आहे. शहरातून अवैध वाहतूक रोखण्यासाठी, विनापरवाना वाहतूक करण्याला आळा घालण्यासाठी तसेच रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर आता संबंधित पोिलस ठाण्याचे पोिलस कर्मचारी कारवाई करणार आहेत. यापूर्वी अशी वाहने आढळल्यास पोिलस १०० ते २०० रुपयांचा दंड आकारून चालान भरून वाहने सोडून देत होते. मात्र, ही पद्धत आता जिल्हा पोिलस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी बंद केली आहे. अशी वाहने आढळल्यास ती वाहने पोिलस ठाण्यात आणून जप्त करण्यात येणार आहेत आणि भादंवि कलम २८३ अन्वये वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून, अशी वाहने न्यायालयाच्या आदेशावरूनच मिळणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आता रस्त्यावर वाहने उभी करताना विचार करावा लागणार आहे.
कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर वाहनांची सर्व कागदपत्रे पडताळूनच वाहने ताब्यातमिळणार आहेत. कागदपत्रांची पूर्तता नसल्यास अशा वाहनांवर पाणी सोडावे लागणार आहे.