आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patur Akola Riots Shivsean Leader Diwakar Rawte Meet Police Officers

पातूरमध्ये शांतता; परिस्थितीवर नियंत्रण, लोकप्रतिनिधींची नागरिकांसह अधिकार्‍यांशी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर /अकोला - पातूर येथे सोमवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर मंगळवारी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी मंगळवारी महिला-पुरुषांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अकोला, वाशिम व बाळापूर मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते आणि पोलिस अधिकार्‍यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले.