आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधींच्या निधीतून पातूर शहराचा होतोय कायापालट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर - सोन्याच्या गिन्न्यांचे शहर म्हणून पातूरची सर्व दूर ओळख असली, तरी येथे विकासाची कामे अपेक्षेनुसार झाली नव्हती. मात्र, मागील वर्षीच्या जुलै महिन्यात हिदायत खान यांनी येथील नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यावर शहरात विविध विकासकामे करण्याचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे शहराला तरी अच्छे दिन येत असल्याचे दिसत आहे.

बोर्डी नदीला पूर आल्यास मुस्लिम बांधवांना कब्रस्तानमध्ये जाणे कठीण होत असे. त्यामुळे या समस्येबाबत शासनदरबारी पाठपुरावा करून नगराध्यक्षांनी एक कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण केले. त्यासोबतच आठवडी बाजाराची निर्मिती करून जातीय सलोखा कायम ठेवण्यात यश मिळवले. नवरात्रोत्सवादरम्यान येथील रेणुका माता मंदिरात दूरवरून भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दशहरा मैदानाचे सौंदर्यीकरण करण्यावर भर दिला. त्यासोबतच सत्ताधाऱ्यांकडून सर्वच धार्मिक स्थळांचा विकास करण्यालाही प्राधान्य दिले आहे.

प्रलंबित असलेल्या सुजल निर्मल पाणीपुरवठा योजनासाठी पाठपुरावा करून लाखो रुपयांचा निधी खेचून आणला. तसेच शहरामध्ये सांस्कृतिक सभागृह नव्हते. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन या प्रलंबित कामास सुरुवात करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत बहुद्देशीय सांस्कृतिक सभागृह पातूरवासीयांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.

विकासकामे करणे हेच आमचे ध्येय
शहराचाविकास कसा करायचे हेच आमचे एकमेव ध्येय आहे. आमच्या कार्यकाळात ज्या काही योजना येतील त्या पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. आगामी निवडणुकीपर्यंत एकही काम अपूर्ण ठेवण्यात येणार नाही.'' जगदीशखंडारे, सदस्य नगरपालिका, पातूर

शहर कात टाकतेय
पातूरशहर हे तालुक्याचे ठिकाण असूनही येथे पाहिजे तसा विकास झालेला नव्हता. मात्र, जुलै २०१४ ते आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधींचा निधी खेचून आणला शहरात विविध ठिकाणी विकासकामे केली. त्यामुळे शहर कात टाकत असल्याचे दिसून येत आहे.'' प्रदीपकाळपांडे, तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पातूर

शहर झोपडपट्टीमुक्त करण्याला प्राधान्य
दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत दलित वस्ती प्रभागात घरकुलांचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच रमाई योजनेकरिता एक कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. शहर झोपडपट्टीमुक्त करण्यास प्राधान्य देणार आहे.या कामासाठी सर्वांची मदत मिळत आहे.'' हिदायतखान, नगराध्यक्ष, पातूर

- पातूर येथील बोर्डी नदीवर बंधाऱ्याचे काम सुरू आहे.
- बहुद्देशीय सांस्कृतिक सभागृह
- बोर्डी नदीवरील बंधारा
- आठवडी बाजारातील मार्केट
- सुजल योजनेच्या पाण्याची टाकी

अशी आहेत कामे
- एकूणकामे १८
- एकूण निधी अंदाजे कोटी रुपये
- पूर्ण झालेली कामे १४
- प्रगतिपथावरील कामे ०४