आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकांना बालरोग तज्ज्ञांकडून ‘डोस’ देण्‍याची आली वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मुलाला थोडी जरी दुखापत झाली तरी प्रत्येक पालक अस्वस्थ होऊन जातो. त्यांच्या मन:स्थितीचा फायदा घेताना शहरातील अनेक बालरोग तज्ज्ञ दिसत असून, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांना थेट आयसीयूत उपचार करावे लागणार असल्याचा सल्लारूपी ‘डोस’ पालकांना दिला जात असल्याची उदाहरणे शहरात घडत आहेत.
तातडीने उपचार मिळून मुलगा पुन्हा खेळताना, अभ्यास करताना पालकांना पाहावा वाटत असतो. चांगला डॉक्टर म्हणून एखाद्याकडे दाखल केले तर आज पाच ते 50 हजारांपर्यंतचा खर्च होत आहे. बालकांवरील उपचार मोठा खर्चीक झाला आहे. शहरातील अनेक हॉस्पिटल्समधील लहान मुलांच्या उपचाराच्या खर्चाचे बिल 50 हजार रुपयांपर्यंत निघाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. बरेचदा पैशाच्या जमवाजमवीत लहानग्याला प्राणही गमवावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत. बालकांच्या प्रकृतीची ढाल बनवत पालकांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू आहे. मात्र, उघडपणे बोलायला पुढे कुणी धजावत नसल्याने डॉक्टरांचे चांगलेच फावत आहे.

गरज नसताना आयसीयूचा आग्रह
आपत्कालीन परिस्थितीमध्ये आयसीयू ठीक आहे. पण, थोडा जरी आजार झाला की बालकाला आयसीयूमध्ये ठेवण्याचा डॉक्टरी ‘सल्ला’ दिला जात आहे. वास्तविकता जनरल वॉर्डात बालकावर उपचार केले जाऊ शकतात. पण, केवळ पैशाच्या मोहापोटी आयसीयूचा आग्रह धरल्या जात असल्याने पालकांची आर्थिक लूट होत आहे. प्रामुख्याने हे प्रकार रात्रीच्या वेळी जास्त घडतात, पण पालक याविषयी बोलण्याचे टाळतात.

हॉस्पिटल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट
शहरातील काही नामांकित चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये उंदरांचा मुक्त संचार असल्याचे वास्तव आहे. बाहेरून चकाचक दिसणार्‍या रुग्णालयात अशाप्रकारची परिस्थिती म्हणजे धक्कादायकच आहे. पण, रुग्णालय प्रशासनाला पैशाशिवाय कशाचेही काही देणे घेणे नाही, हे यावरून स्पष्ट होते.