आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ड्राय डे’लाही तळीराम ‘ओले’च, अँटी गुंडा स्कॉडने टाकले छापे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यामध्ये ‘ड्राय डे’ होता. तरीही अनेक ठिकाणी दारूची खुलेआम विक्री करण्यात आली. मूर्तिजापूर रोडवरील महाकाली बारच्या मागच्या दाराने दारू विक्री सुरू होती. त्यावर अँटी गुंडा स्कॉडने छापा टाकला पुढील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली.

महाकाली बारमध्ये दारूची विक्री होत असल्याची माहिती अँटी गुंडा स्कॉडला मिळाली. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, त्यांना बारचे मागचे दार उघडे दिसून आले. पोलिसांना बारमध्ये जाऊन कारवाई करता येत नसल्यामुळे त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कानावर बाब टाकली. त्यामुळे अधिकारी घटनास्थळावर गेले आणि त्यांनी विभागीय कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला. तर शास्त्रीनगर, खडकी आणि जेतवननगरात कारवाई करण्यात आली. या वेळी जेतवननगरातून सदानंद शंकरराव मानकर याच्या घरातून ८०० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली, तर शास्त्रीनगरातून दिनेश गणेश नद्रे याच्या घरातून हजार ३५० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच खडकी येथील संदीप राजेश मेहंगे याच्या घरातून १४ हजार ४६० रुपयांची विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे सर्व ठिकाणची कारवाई अँटी गुंडा स्कॉडचे शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, रमेश गजभार, शक्ती कांबळे, दीपक मोदीराज यांनी केली.

विभागीय कारवाई केली
^राज्यातसर्वत्र ड्राय डे असल्यामुळे दुकान किंवा बार उघडता येत नाही. मात्र, महाकाली बारचे मागचे दार उघडे आढळून आल्यामुळे आम्ही विभागीय कारवाई केली आहे. तेथून कोणतीही दारू जप्त केली नाही. -स्वाती काकडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अकोला

हातभट्टीवर कारवाई
मूर्तिजापूरतालुक्यातील भटोरी या गावामध्ये हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी छापा टाकला असता त्यांनी हजार ५७० रुपयांची दारू साहित्य जप्त केले. याप्रकरणी आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.