आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णेच्‍या दूषित पाण्‍यात उपोषन, नागरिकांची शुध्‍द पाण्‍याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पूर्णेतसाेडले जाणारे दूषित पाणी थांबवून नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या, या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्या शोभाताई शेळके यांच्या नेतृत्वात गांधीग्रामच्या पुलाजवळ दूषित पाण्यात डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. अकोला अमरावती एमआयडीसीच्या कारखानदारांना विभागीय आयुक्तांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पूर्णेच्या पात्रातून पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित अाहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा हाेत असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत समाेर आले अाहे, तरीही याकडे पाणी स्वच्छता मिशन तसेच जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे आज तीनशे गावांतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत अाहे. गेल्या वर्षभरापासून अकोला एमआयडीसी परिक्षेत्रातून निघणाऱ्या रसायनयुक्त पाण्याने पूर्णेकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखान्यांच्या प्रशासनाला लगाम लावण्यात अपयश अाले अाहे. अमरावती विभागीय आयुक्तांनीसुद्धा तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. प्रदूषण नियामक मंडळांची जबाबदारी असतानाही त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. अकोला अमरावतीच्या दोषी कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात गांधीग्राम, केळीवेळी, दोनवाडा, किनखेड, काटीपाटी, गोपालखेड, नैराट, वैराट, धामणा, पिलकवाडी, नखेगाव, सांगवी, नांदखेड, सांगवी, नांदखेड, कट्यार, म्हैसांग, िनंभोरा या गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह नागरिकांनी सहभाग घेतला आहे.
दूषित पाण्याचे आजार
}किडनीचाआजार } हगवण } गॅस्ट्रो, } कॉलरा } त्वचेचे रोग आदी रोग होतात.

फौजदारी कारवाई व्हावी
-दूषितपाण्याप्रकरणी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. दूषित पाणी सोडणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायलाच हवेत.'' गोपालकोल्हे, सदस्य,जिल्हा परिषद
अधिकाऱ्यांजवळ वेळ नाही
-आमचाआवाज ऐकायला कोणत्याही लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांजवळ वेळ नसल्याचे दिसते.'' ज्योतीआढेे, पोिलसपाटील, गांधीग्राम

प्रदूषण मंडळाचे अधिकारी दोषी
-दूषितपाणीप्रकरणी कारखानदार दोषी आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याकडून त्यांना अभय मिळत आहे.'' शोभाताईशेळके, जि.प. सदस्य
‘दिव्य मराठी’ने १४ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून या विषयाची भीषणता मांडली होती.

गांधीग्रामजवळील पूर्णेच्या दूषित पाण्यात आमरण उपोषणाला बसलेल्याजिल्‍हा परिषद सदस्या शोभाताई शेळके, जि.प. सदस्य गाेपाल काेल्हे उपस्थित नागरिक.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट : आरोग्यअधिकारी डॉ. अंबाडेकर यांनी नागरिकांची भेट घेतली. दूषित पाण्याबाबत त्यांनी पाणीपुरवठा िवभागाला लेखी कळवल्याचे त्यांनी सांगितले.
दूषित पाण्याच्या विळख्यातील गावे : {अकोला तालुका - दोनवाडा, गांधीग्राम, एकलारा, आपोती बु, खोबरखेड, अलियाबाद, वाकी, वरोडी, चाचोंडी, अकोला खुर्द, दुधाला, मंडाला {बार्शिटाकळी - भेंडगाव {अकोट - देऊलगाव {बाळापूर - सोनागिरी, कळंबी, वझेगाव, कळंबी खुर्द, दगडखेड, स्वरूपखेड, चिंचोली {पातूर - वसाली, वनदेव, चतारी.
गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
ग्रॅस्ट्रो,कॉलरा, हगवण इत्यादी जलजन्य आजाराची लागण होऊ शकते. पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारणे आवश्यक झाले असल्यानंतरही िनर्जलीकरणावर मात्र, पाणीपुरवठा स्वच्छता मिशनने भर दिलेला िदसत नाही.
सावरकरांकडून दखल : आमदाररणधीर सावरकर यांनी आंदोलनाची दखल घेत उपोषणकर्त्यांची भेट घेतली.ी त्यांनी सामान्यांच्या समस्यांची जाणीव नसलेल्या अधिकाऱ्यांमुळे समस्या निर्माण हाेत असल्याची खंत व्यक्त केली. या प्रकरणी कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनदिले.
ब्लिचिंगचा विसर
ग्रामसेवक,आरोग्यसेवक, जलसुरक्षकांनी आपल्या गावात दूषित पाणी तर पिण्यात येत नाही ना, याची खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडलेला दिसून येतो आहे.
सूचनेकडे दुर्लक्ष
पाण्याच्यानमुन्यावरून २१७ गावांतील जलस्रोत दूषित अाढळून आले. शुद्धीकरण केल्याशिवाय पाणी पिण्यात येऊ नये, असे अावाहन आरोग्य अधिकारी डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केला आहे. त्यांच्याही सूचनेकडे दुर्लक्ष झाले.