आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेलचे दर कमी; वाहतुकीचे तेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पेट्रोल,डिझेलच्या दरात रुपयांनी पुन्हा कपात झाली, तरीही वाहतुकीचे दर मात्र तसूभरही कमी झालेले नाहीत. खासगी वाहतूकदार, रेल्वे यांनीही पेट्रोलिअम पदार्थांच्या दराप्रमाणे दर कमी केले नाहीत. वाहतुकीचे दर पूर्वीप्रमाणेच असल्याने जनतेला प्रत्यक्ष लाभ झाला नाही. सध्या पेट्रोल ६९.२७ रु., तर डिझेल ५८.०९ रु. लीटरप्रमाणे विक्री होत आहे.
ट्रक भाड्याचे दरही आहे तेच आहेत. डिझेल ७२ रुपये असताना अकोला-खामगाव वाहतूक भाडे २२०० रुपये होते. ते डिझेलच्या दरात सतत घसरण होऊनही कायम आहेत. अकोला-जयपूर मालाच्या ने-आणसाठी २२५ रु. क्विंटलप्रमाणे दर आकारला जात आहे. त्यातही कमतरता आलेली नाही. माल भाडे कमी झाले, तर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कमतरता येऊ शकते. एकदा भाववाढ झाली की, त्यात फरक करायचाच नाही, हा नियम होऊन बसतो. त्याचा फटका ग्राहकांना बसतो. गेल्या सहा महनि्यांचा विचार केला, तर डिझेलच्या दरात आठ वेळा घसरण झाली आहे. महाराष्ट्रात एलबीटी लागू असल्याने अन्य राज्यांच्या तुलनेत येथे डिझेल महाग आहे. एलबीटी हटला, तर डिझेलच्या दरात आणखी कपात होऊ शकते. प्रवासी भाडेही कमी व्हावे, ही जनतेची अपेक्षा आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे. संबंधितांना तसे पाऊस उचलण्यास बाध्य करावे, अशी मागणीदेखील होत आहे.