आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलची टंचाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भारत पेट्राेलियमने मनमाड येथील पेट्रोल डिझेल साठा दिल्लीला पाठवल्याने अकोला जिल्ह्यातील गायगाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोलनेर येथे पेट्रोल व्हॅन आल्याच नाही. पेट्रोल डिझेल मिळाल्याने गेल्या दहा दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल टंचाई निर्माण झाली आहे.

भारत पेट्रोलियम कंपनीने मनमाडचा पेट्रोल साठा दिल्लीला पाठवल्याने अकोला, बुलडाणा वाशीमसह अहमदनगर जिल्ह्याला पेट्रोल मिळाले नाही. दहा दिवसांमध्ये या पेट्रोलपंपांवर कमी जास्त प्रमाणात पेट्रोलचा तुटवडा भासल्याने पेट्रोलपंप बंद ठेवले हाेते. वाहनधारकांना वेळेवर पेट्रोल मिळाल्याने चांगलीच कसरत करावी लागली. या सर्व प्रकाराची माहिती अकोला पेट्रोल - डिझेल असोसिएशनने कंपनीला दिली होती. त्यामुळेच मनमाड येथून भारत पेट्रोलियम कंपनीचे मॅनेजर अकोल्यात येत असून, याबाबत पेट्रोलपंप संचालकांसोबत बैठक घेत आहेत. बैठकीत तोडगा िनघाला, तर पेट्रोल साठा मिळू शकतो, अशी अपेक्षा आहे. नाहीतर आणखी दहा दिवस वाहनधारकांना कसरत करावी लागेल यात शंका नाही.

आज कंपनीचे अधिकारी अकोल्यात
शनिवारी,सकाळी १० वाजता भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी अकोल्यात येत आहेत. त्यांची पेट्रोलपंप संचालकांसोबत संयुक्त बैठक होत आहे. बैठकीत तोडगा निघाल्यास पेट्रोल सुरळीत मिळेल, अशी अपेक्षा आहे. नाहीतर आणखी काही दिवस पेट्रोल मिळण्याची शक्यता कमी आहे.

शहरातील पेट्रोलपंपही बंदच : भारतपेट्रोलियम कंपनीचे शहरातील पेट्रोलपंपही बंद दिसून आले. या ठिकाणी कंपनीकडून पेट्रोल मिळाल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. पेट्रोल - डिझेल वेळेत मिळाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

आज अकोल्यात होणार बैठक
कंपनीकडूनच पेट्रोल आले नसल्याने पेट्रोलपंपांवर टंचाई आहे. शनिवारी सकाळी कंपनीचे अधिकारी अकोल्यात येत आहेत. काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती पेट्रोल - डिझेल असोसिएशन, अकोलाचे अध्यक्ष राठी यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...