आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात फार्मासिस्टच्या नावाने ‘दुकानदारी’; दलालही आहेत सक्रिय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- औषधी दुकानदारांनी फार्मासिस्टची नियुक्ती करून औषधी विक्री करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहेत. मात्र, या आदेशाला काही औषधी दुकानदारांनी हरताळ फासली आहे. याचाच फायदा घेत अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांनी आपली दुकानदारी थाटली आहे. थोड्याफार प्रमाणात करण्यात येणार्‍या कारवाईतही भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.

जिल्ह्यात औषधीच्या दुकानांवर योग्य शिक्षण न घेतलेल्या कामगारांकडून काम करून घेण्यात येत असून, ही बाब रुग्णांच्या जीवावर बेतणारी आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शहरात केवळ काही ठरावीक औषधी दुकानांवर कारवाई होत असल्याचा आरोप होत आहे. औषधी दुकानदारांनी फार्मासिस्टची नियुक्ती करून औषधी विक्री करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहे. औषधी दुकानदार अद्यापही फार्मासिस्टची नियुक्ती करत नसून अशिक्षित व ज्यांना इंग्रजीचे ज्ञान नाही अशा कामगारांकडून औषधी विक्रीचे काम करत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतणार असल्याने गुरुवारी 25 औषधी दुकानदार यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत मोठा भेदभाव केल्याचा आरोप होत आहे.