आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phule Development Corporation Manager Catch By Police During Corruption

फुले विकास महामंडळाचा व्यवस्थापक जाळ्यामध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कर्ज मंजुरीसाठी कारचालकाच्या माध्यमातून एक लाख 95 हजारांची लाच स्वीकारणारा महात्मा फुले विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक सॅमसन बाबुलाल जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून शुक्रवार, 11 एप्रिलला अटक केली. दरम्यान, त्याचा चालक मंगेश इंगळे आणि महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांचा खासगी स्वीय सहायक धनवंत आठवलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील मंगेश इंगळेलाही अटक केली आहे.

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, एका व्यक्तीने एसीबीकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, आपल्यासह इतर सहकार्‍यांच्या 120 फाइलचे कर्ज मंजूरीसाठी जाधव याने एक लाख 95 हजारांच्या लाचेची मागणी केली, असा आरोप संबंधितानी केला होता. त्या आधारे एसीबीने सापळा रचला. लाच स्वीकारण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक जाधव याने आपला खासगी चालक इंगळे याला अकोट येथे पाठवला. एसीबीच्या पथकाने अकोट येथून पंचासमक्ष इंगळे याला एक लाख 95 हजारांची लाच घेताना पकडले. याप्रकरणी जाधव आणि इंगळे या दोघांनाही अटक केली असून, महात्मा फुले विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापकांचा खासगी सचिव आठवले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक तळवी यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ र्शीकांत कंकाळ, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पीएसआय सुधाकर गाडगे, कैलास खडसे, सुरेश महल्ले, राजेश काळे, शेखर फुलकर, विनोद गोपनारायण, शेख जावेद, सचिन चव्हाण, धामोडे, सुनिल राऊत यांनी केली.

जाधवनेही केली होती तक्रार महात्मा फुले विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक सॅमसन जाधव हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणात जाधव याने अन्य लोकसेवकाची एसीबीकडे तक्रार केली होती. त्या वेळी आपल्याला लाच देणे आणि घेणे हे पटत नसल्याचे त्याने सांगितले. मात्र, जाधव याने तक्रारीच्या वेळी दिलेली माहिती अपूर्ण असल्याने त्या वेळी एसीबीने लावलेला सापळा फसला. पण, शुक्रवारी जाधव हा स्वत:च एसीबीच्या जाळ्यात अडकला.