आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपार्टमेंटमध्ये कुटुंब १०, नळजोडणी मात्र एकच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापािलकाक्षेत्रातील फ्लॅट सिस्टिममध्ये नळजोडणी एक, तर उपयोग करणारे किमान १० ते १५ कुटुंब, असा प्रकार असल्याने महापािलकेला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे पाणीपुरवठा योजना तोट्यात चालवावी लागत आहे.
मनपाला योजना चालवण्यासाठी वर्षाकाठी नऊ ते दहा कोटी रुपये खर्च येतो. त्यातुलनेत पाणीपट्टीची वसुली होत नाही. शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या अवैध नळजोडण्या यास कारणीभूत ठरल्या आहेत. आतापर्यंत वैयक्तिक अवैध नळजोडण्यांवरच प्रशासनाने कारवाई केली. एकीकडे कारवाई, तर दुसरीकडे अवैध नळजोडण्या वैध करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले. अवैध नळजोडणीत आतापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच फौजदारी गुन्हे दाखल केल्यानंतर दहा जणांना या प्रकरणात अटकही झाली. दोन दिवसांपूर्वी थेट नळजोडण्या तोडण्याची थेट कारवाई करण्यात आली. परंतु, अद्यापही हजारो नळजोडण्या अवैध आहेत. ज्या नळजोडण्या अवैध आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, नळजोडणी वैध असल्यास त्यावर कारवाई करता येत नाही. नळजोडणी अधिकृत असल्याने अशा ठिकाणी कारवाई केली जात नाही अथवा त्याकडे लक्षही दिले जात नाही. परंतु, वैयक्तिक अवैध नळजोडणीधारकापेक्षाही अधिकृत अवैध नळजोडणीचा गैरवापर केला जात आहे. विशेष म्हणजे, फ्लॅट सिस्टिममध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. मनपाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे.
या प्रकाराबाबत शोध घेऊन या सर्व मालमत्ताधारकांवर एक तर स्वतंत्र पाणीपट्टीची आकारणी केली जाईल, अथवा त्यांना स्वतंत्र नळजोडण्या दिल्या जातील.'' नंदलालमेश्राम, उपअभियंतामहापािलका, पाणीपुरवठा विभाग.