आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नळजोडणी धारकांकडून ९३ हजारांचा दंड वसूल, महापालिकेची दुसऱ्याही दिवशी धडक कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातीलअवैध नळजोळण्या वैध करण्याची धडक मोहीम महापालिकेने शुक्रवारी दुसऱ्याही दिवशी केली. त्यात ४७ नळधारकांकडून ९३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात अवैध नळजोडण्या असल्यामुळे आयुक्तांनी १८ सप्टेंबरपासून अवैध नळजोडणी शोधमोहीम सुरू करण्याचे आदेश दिले . त्यानुसार पहिल्या दिवशी ४५ अवैध नळधारकांना नोटीस दिल्‍या होत्या.

त्यांच्याकडून महापालिकेला ४६ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लाख ६९ हजार २०० रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश आयुक्तांनी अभियंत्यांना दिले होते. त्यानुसार आज, ९३ हजार ६०० रुपयांचा महसूल अवैध नळजोडणीतून महापालिकेला प्राप्त झाला आहे, तर आयुक्तांनी पाच अभियंत्यांना कोटी रुपयांच्या वसुलीचे निर्देश अवैध नळजोडणीतून दिल्याची माहिती आहे.