आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहनी फुटली; नागरिकांची तोडफोड; रिलायन्स खोदकामामुळे फुटली जलवाहनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रिलायन्सच्या खोदकामादरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहनीची तुटफूट झाल्याने इन्कम टॅक्स चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी ट्रकसह पाण्याच्या टँकरच्या काचा फोडल्या. शविसेना पदाधिकाऱ्यांसह मनपाच्या अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण नविळले.

गोरक्षण रोडवरील व्ही. एच. बी. कॉलनीजवळ रिलायन्स कंपनीच्या कामगारांमार्फत फोर-जी ची भूमिगत जोडणीचे काम सुरू आहे. रात्री ८.३० च्या सुमारास या भागात हे काम सुरू असताना गोरक्षण संस्थानसमोरील पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहनी फुटली. त्यामुळे रस्त्यावर पाणी व चिखल साचला. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे रस्त्याने ये -जा करणाऱ्या अनेक वाहनधारकांचा अपघात झाला. या घटनेने या भागातील नागरिक एकत्र आले. यात वाद होऊन प्रकरण वाढले. दरम्यान, काही नागरिकांनी उभे असलेले जी. जे. ०३- ए. जे. ५६९ हा पाण्याचा टँकर व जी.जे. ९०८९ क्रमांकाच्या ट्रकच्या काचा फोडल्या. रिलायन्सच्या वायरिंगचीही मशीन फोडली. वेळीच नगरसेविका करुणा इंगळे, बाळ टाले, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, जि.प.सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी अादींनी धाव घेत नागरिकांना शांत केले.

जलवाहनी दुरुस्त करू : घटनेची माहिती मिळताच पोलिस व महापालिकेचे अभियंता राजेश श्रीवास्तव, क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे पोहोचले. पहलि्यांदा जलवाहनी दुरुस्तीचे काम होईल आणि नंतरच रिलायन्सचे काम होईल, अशी ग्वाही अधिकार्‍यांनी दिली.

कारवाई करावी
यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी. रिलायन्समुळे खोदकामामुळे पाइपलाइनची तुटफूट होत आहे. पाण्याच्या अपव्ययास जबाबदार असणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करा. जनसुविधा खोळंबणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.''
करुणा इंगळे, नगरसेविका.