अकोला- राज्यातील 33 टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित करण्याचे उद्दिष्ट घेऊन राबवण्यात येणा-या वृक्षारोपण मोहिमेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र एका अहवालातून समोर आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तालुक्यातील 207 ग्रामपंचायतींच्या कामाची तपासणी केली असता, लावण्यात आलेल्या लाख ८७ हजार ९६८ वृक्षांपैकी केवळ ५९ हजार ४७४ वृक्षच जिवंत आहेत. ग्रामपंचायतनिहाय अहवाल पाहिला असता केवळ 15 ग्रामपंचायतींचे काम ८० टक्के समाधानकारक असून, ५३ ग्रामपंचायतींचे काम निरंक आहे. जिल्ह्यातील वृक्षारोपण, संवर्धनाची टक्केवारी ३१.६४ आहे. त्यामुळे ग्रामपंचायती वृक्षारोपणात धन्य, मात्र संवर्धनात शून्य म्हटल्यास काहीच वावगे ठरू नये.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ टक्के जमीन वृक्षाच्छादित असावी म्हणून शासनाने २०१२ च्या पावसाळ्यात १०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. मात्र, सदर उद्दिष्ट साध्य करणे शक्य नसल्याने ते निम्म्यावर म्हणजे ५० कोटींवर आले. त्यानंतर ३० कोटी निर्धारित करण्यात आले. त्यानंतर २०१३ च्या पावसाळ्यात उर्वरित वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साधण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागप्रमुख, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेऊन १९ कोटी ८६ लाख असे अंतिम उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यावेळच्या नियोजनानुसार ग्रामविकास विभागास कोटी ५४ लाख २१ हजार ५९० वक्ष लागवड, वन विभागास कोटी १४ लाख १६ हजार ३८४ वृक्ष, कृषी विभागास कोटी ९२ लाख ९१ हजार ५८२ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तसेच त्यामध्ये वेळोवेळी आवश्यक ते बदल करण्यात आले. तसेच दरवर्षी पावसाळ्यात वृक्षदिंडी, वृक्षारोपणाविषयी जनजागृती, अनेक स्वयंसेवी संस्था, शाळा, विद्यालये, शासकीय यंत्रणांमार्फत वृक्षारोपणावर भर दिला जातो. मात्र, वृक्ष संवर्धनाचा विसर पडतो. मनरेगांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राबवलेल्या वृक्ष लागवडीचा आढावा घेण्यात आला असता, तेच सत्य समोर आले. अकोला तालुक्यातील २७ कामे तपासली असता लावण्यात आलेल्या झाडांची संख्या २१ हजार ७५५ असून, आजमितीस जिवंत झाडांची संख्या केवळ हजार ९२० एवढीच आहे. २७ कामांच्या तपासणीत कामे खूप चांगली (म्हणजे ८० टक्के झाडे जिवंत), समाधानकारक (६० टक्के झाडे जिवंत), कामे समाधानकारक, कामे असमानकारक तर कामे निरंक आढळली. हीच अवस्था बार्शिटाकळी तालुक्याची दिसून आली. या तालुक्यातील ४२ कामांची तपासणी झाली. त्यामध्ये लावण्यात आलेल्या २६ हजार ६२२ वृक्षांपैकी आज ११ हजार २१९ वृक्ष जिवंत आहेत. या तालुक्यात कामे खूप चांगली, १० कामे निश्चित चांगली, कामे समाधानकारक, १३ कामे असमाधानकारक तर १२ कामे निरंक आढळली. अकोटात १६ हजार ३३२ वृक्षांपैकी केवळ हजार ८६४ झाडे जिवंत आहेत.