आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये २०१५ वृक्षांचे रोपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- २०१५ या वर्षी पावसाळ्यामध्ये २०१५ झाडे लावण्याची महत्त्वाकांक्षी योजना पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या वतीने राबवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकांत सागर यांनी दिली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलिस प्रशिक्षण केंद्रात टॉप चॅम्पियन अंतर्गत महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. या वेळी प्राचार्य सागर बोलत होते.
पोलिस प्रशिक्षण केंद्रात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर टॉप चॅम्पियन अंतर्गत महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार गोवर्धन शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस दलाची जबाबदारी समाजात महत्त्वाची असल्याने प्रशिक्षणार्थींनी पोलिसविषयक सर्वंकष बाबींचे महत्त्व प्रशिक्षणादरम्यान समजून घ्यावे पोलिस दलाची प्रतिमा समाजात मानाची राहील यासाठी प्रयत्न करावे, असे सांगून पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथील सामाजिक बांधिलकीने राबवल्या जाणाऱ्या वृक्षारोपणाच्या मोहिमेचे कौतुक आमदार शर्मा यांनी केले. या वेळी कार्यक्रमाला पोलिस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींनी वृक्षारोपण केले.
कार्यक्रमाला पोलिस प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य दिनकर महाजन, लायन्स क्लबचे सदस्य डॉ. सावजी, सुभाष चांडक, रोटरी क्लबचे डॉ. वाघेला, डॉ. परमार यांच्यासह विधी अधिकारी पोलिस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
झाडे लावण्याचा केला संकल्प
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पोलिस प्रशिक्षण केंद्रात टॉप चॅम्पियन अंतर्गत महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या कार्यक्रमात पावसाळ्यामध्ये झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाला पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सर्व आंतरवर्ग, बाह्यवर्ग अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.