आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक पिशव्यांविरोधी अकोला शहरात अभिनव उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- नागरिकांना या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे औचित्य साधून निसर्ग कट्टा व स्वावलंबी इको क्लबतर्फे वापरलेल्या साड्यांपासून मोठय़ा पिशव्या बनवून बाजारात व गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. या पिशव्यांवर ‘उज्ज्वल भविष्यासाठी पर्यावरण सांभाळा, प्लॉस्टिक कॅरीबॅग टाळा’, ‘प्लास्टिक कॅरीबॅगला नाही म्हणा, घरूनच कापडी पिशवी आणा’, तसेच जो करेगा धरतीसे प्यार वो करेगा प्लास्टिक कॅरीबॅगसे इन्कार, असे विविध संदेश लिहिण्यात आले आहेत.
या उपक्रमाविषयी बोलताना अमोल सावंत म्हणाले की, सध्या जाहिरातींचे युग आहे. एखादा संदेश लोकांच्या मनावर बिंबवायचा असेल तर तो संदेश वेगवेगळ्या कल्पक माध्यमातून लोकांच्या समोर आला पाहिजे. त्यामुळे तो संदेश लोकांच्या लक्षात राहतो व इच्छित परिणाम साधल्या जातो. या मोठय़ा कापडी पिशव्या नागरिकांना सदैव आठवण करून देतील तसेच प्लास्टिक पिशव्यांमुळे होणार्‍या प्रदूषणावर आधारित फिल्म, स्लाइड शो नागरिकांना दाखवण्यात येतील. उपक्रमाचा शुभारंभ स्वावलंबी विद्यालयातून करण्यात आला. येथे चार फुटाची मोठी कापडी पिशवी लावण्यात आली आहे. उपक्रमासाठी स्वावलंबी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुमंगला बुरघाटे, इको क्लबचे प्रभारी शिक्षक हरीश शर्मा, सौरभ मारोठे, करण साहू, सूरज शर्मा, ऋषभ शर्मा, अब्दुल साजीद, विशाल तिवारी तसेच निसर्गकट्टाचे गौरव झटाले, विजय पवार, प्रेम अवचार यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.