आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Play Cricket Betting On The Possession Of The Police

क्रिकेटवर सट्टा खेळणारे पोलिसांच्या जाळय़ात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरातील दीपक चौकातील शाहू पान सेंटरवर धाड टाकून रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 10 सटोड्यांना साहित्यासह अटक केली.भारत-न्यूझीलंड एक दिवसीय क्रिकेट मालिकेतील पाचव्या सामन्यावर दीपक चौकातील शाहू पान सेंटरमध्ये सट्टा लावला जात असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शाहू पान सेंटरवर दुपारी 1 वाजता धाड टाकली.
या वेळी आरोपी हिंमत भिकुलाल भट्टी (32), डाबकी रोड, राकेश राजू गोहर (30) रा. डाबकी रोड, विपुल दीपक मोरे (23) रा. मानेक टॉकीज जवळ, शैलेशकुमार सीतारामजी बनिया (28) आर.बी. माळीपुरा चौक, जाकीर अली अख्तर अली (30) लक्कडगंज, अलीअरखान वल्द मुशदरखान (37) रा. लक्कडगंज माळीपुरा, राहुल उर्फ पिंटू गिरधारी काळे (28) माळीपुरा, शे. अकबर ताजमोहम्मद रेधीवाले (27) गवळीपुरा बाबाजी मठ, अन्सारखान सुभेदार खान (33) मुझफ्फरनगर, अजय लल्लू शाहू (31) यांना अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून 35 हजार 250 रुपये नगदी आणि 14 मोबाइल, एक टीव्ही, महिंद्रा स्कुटी एम.एच.30 ए.सी. 4658 आणि यामाहा दुचाकी एम.एच. 30 ए.एच. 6501 जप्त करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार विलास पाटील, पोलिस कॉन्स्टेबल ए.पी. खोडेवाड, संगीता रंधे, सुनील टापेकर, आशीष ठाकूर, सुरेंद्र वाघ, जयकुमार मंडावरे यांनी केली.