आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पावसाक्षरं’मुळे रेखाटली गेली पावसाची विविध रुपे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘पाऊस टाळतो येणे,

कधी विसरतो जाणे,

कणसाच्या गावाकडली

वाट हरविती दाणे’

या तिफनकार विठ्ठल वाघांच्या ओळीतून पावसाची दोन्ही रुपे अल्पाक्षरात पावसाक्षरं च्या निमित्ताने दिसून आली. पावसाचे अनेकविध रंग, भाव, स्वभाव, रुप कविंनी उलगडले. शब्द आणि टाळ्यांच्या पावसाचा सभागृहात पूर होता.

विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे साने गुरुजी वाचनालयाच्या सहकार्याने दहा ऑगस्टला ‘पावसाक्षरं’ या पावसावर आधारित काव्यमैफील झाली. अध्यक्षस्थानी वर्‍हाडी कवी विठ्ठल वाघ होते. व्यासपीठावर साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा पद्मा मांडवगणे, रजनी महाजनी उपस्थित होत्या. कार्यक्रमास माजी मंत्री सुधाकर गणगणे, भाऊसाहेब मांडवगणे, बाजी वझे, अशोक ढेरे आदींची उपस्थिती होती. काव्य संमेलनात माणिक नेरकर, मो. ज. मुठाळ, गोविंद मोतलग, मिलींद बढे, निलीमा पाटील, प्रा. विजया खांडेकर, कांचन पटोकार, पद्माकर कळस्कर, किशोर बळी, सुरेश पाचकवडे, कविता राठोड, सीमा शेट्ये, प्रशांत असणारे, श्रुती राजे यांनी कवितांचे सादरीकरण केले.

काव्यमैफीलीचा शेवट वाघांच्या कवितांनी झाला. प्रतिमा आणि प्रतिक कवितेचा आत्मा असून हे ज्याला जमते त्यांनीच कविता कराव्यात, असा सल्ला देत त्यांनी कवितेला हात घातला. अल्पाक्षरात मनातील भाव कसा मांडावा हे सांगताना त्यांनी ‘तुया रुपाची नवरी कधी येणार भरुन, माया डोयाची पालखी उभी सजून धजून’ या ओळी मांडल्या. सीमा शेट्ये यांनी आभार मानले. यावेळी व्यंगचित्रकार गजानन घोंगडेच्या कॅलीग्राफीचेही प्रदर्शन होते. पावसावरील ओळी कॅलीग्राफीतून साकारुन त्यांनी पावसाचे आणखी एक रुप समोर आणले.