आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमावस्येची रात्र... अन् पोलिसांची गस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रविवारची पूर्ण रात्र अमावस्येची रात्र होती. या रात्री पोलिसांनी रात्र जागवून काढली. कशासाठी तर भूतांच्या भीतीपोटी.. अंधश्रद्धा म्हणून की आणखी काही, असा प्रश्न उपस्थित होऊन पोलिस तुम्हीही..असा प्रश्न उपस्थित झाला असेल. पण, त्याचे कारण वेगळेच आहे. या दिवशी नरबळी देण्याची दाट शक्यता असते आणि ती हाणून पाडण्यासाठी पोलिस डोळ्यात तेल घालून दक्षता घेतात आणि अख्खी रात्र इमानेइतबारे गस्त देऊन जागून काढतात.
पोलिस प्रत्येक अमावस्येच्या रात्री कडक पोलिस बंदोबस्त आखतात. या दिवशी प्रत्येक पोलिस ठाण्यात रात्रीच्या गस्तीचा वेगळा कार्यक्रम असतो. शक्यतो, या दिवशी पोलिसांना सुटी राहत नाही. या दिवशी पोलिसांसाठी "हायअलर्ट'चा दिवस असतो.
इतर दिवशीची रात्रीची गस्त आणि अमावस्येच्या रात्रीची गस्त यामध्ये मोठा फरक असतो. कारण, याच दिवशी अघोरी कृत्य घडल्याच्या अनेक घटना आहेत. नरबळी देण्यासाठी मांत्रिक मध्य रात्रीची वेळ निवडतात. ते प्रकार टाळण्यासाठी या दिवशी पोलिस शहरभर चोख बंदोबस्त ठेवून गस्त वाढवतात आणि जिल्ह्यांच्या सीमेवर नाकाबंदी करतात.
अनुचित घटना टाळण्यासाठीच गस्त
प्रत्येकअमावस्येच्या रात्री दक्षता घेतल्या जाते. मांत्रिकांकडून किंवा समाजकंटकांकडून काही अनुचित घटना घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रात्रीचा उपयोग नरबळीसाठी अघोरीविद्या असणारे मांत्रिक घेतात. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस प्रशासन या रात्री दक्ष असते. यामुळे अशा घटना टाळण्यास मोठी मदत होते.'' सुधाकर देशमुख, पोलिसनिरीक्षक अंधविश्वास