आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Arrangements For Ganesh Festival At Akola

गणेशाेत्सवात तगडा पोलिस बंदोबस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गणेशाेत्सवादरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबािधत राहावी, यासाठी पोिलस विभागाच्या वतीने जिल्ह्यासह शहरामध्ये तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीआरपीएफची कंपनी आणि एक एसआरपीची कंपनी शहरात गुरुवारीच दाखल झाली आहे.
जिल्ह्यातील संवेदनशील तालुके आणि शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. इंदूर येथून सीआरपीएफची कंपनी आणि अमरावती येथून एसआरपीची कंपनी शहरात दाखल झाली आहे. तसेच या बंदोबस्तासाठी पाेलिस उपअधीक्षक दर्जाचे पाच अधिकारी, १५ पोिलस उपनिरीक्षक, अतिरिक्त १०० पोलिस कर्मचारी, ५० महिला अधिकारी, ६०० पुरुष आणि १०० महिला होमगार्ड आणि जिल्ह्यातील पोिलस बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात अाले आहेत. गुरुवारी मूर्तिजापूर, अकोट आणि पातूर येथे एसआरपीचे काही जवान पाठवण्यात आले आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षकांनी सर्व २१ ठाणेदारांना दिशानिर्देश दिले आहेत.