आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपाइं महानगराध्यक्ष कांबळे गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ११ऑगस्ट रोजी जेवणाचे बिल देण्यावरून पातूररोडवरील हॉटेल जयराज बारमध्ये सात ते आठ जणांनी दारू पिल्यानंतर िबल देण्याच्या वादातून वाइनबारचे व्यवस्थापक सुनील नारायणराव धोपेकर यांना मारहाण केली होती. गंभीर जखमी झालेल्या धोपेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी आठ आरोपींना अटक केली होती.
रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे यालासुद्धा या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. तेव्हापासून फरार असलेल्या कांबळे यास जुने शहर पोिलसांनी शुक्रवारी अटक केली अाहे. त्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानेदिले आहेत. पातूररोडवरील जयराज वाइनबारमध्ये ११ ऑगस्टच्या रात्री सहा जण खाण्यािपण्यासाठी गेले होते. त्यांनी यथेच्छ दारू ढोसल्यानंतर िबल देण्यास नकारदिला होता. तसेच धोपेकर यांना शिवीगाळ करून, जबर मारहाण केली. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुने शहर पोिलसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.