आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी "सम्राट'ला कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेलेे भारिपचे सम्राट सुरवाडेला २४ जानेवारी रोजी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी पीसीआरमध्ये वाढ करण्याची िवनंती केली असता, ती फेटाळत न्यायालयाने सुरवाडेला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या प्रकरणात सुरवाडेविरुद्ध भादंवि ४५२, ३८७ आर्म अॅक्टअन्वये गुन्हे दाखल करून अटक केली होती. दरम्यान, न्यायालयात सुरवाडेच्या वतीने अधिवक्ता डॉ. रवींद्र कोकाटे यांनी बाजू मांडली. अॅड. अमोल सिरसाट, अॅड. प्रवीण तायडे, अॅड. सुमेध वानखडे यांनी पीसीआर वाढीला विरोध दर्शवला. न्यायाधीश देशपांडे यांनी सुरवाडे यांचे बयाण वस्तुस्थिती लक्षात घेता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, मिठा वाह सिंधव यांच्याजवळचे असलेले अशोक शुक्ला यांनी २२ जानेवारी रोजी नेहरू पार्क चौकात कोणतेही कारण नसताना शिवीगाळ धक्काबुक्की केल्याची तक्रार सम्राट सुरवाडे यांनी पोलिसात केली असून, गुन्हा दाखल आहे.

शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कोणतीही चौकशी शहानिशा करता अमानुषपणे मारहाण केल्याची तक्रार सम्राट सुरवाडे यांनी न्यायाधीशांकडे केली. सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये माध्यमांशी बोलताना शहर पोलिस अधीक्षक मुंढेंपासून जीवाला धोका असल्याचे सांगितले.

आधी मेडिकल करा
मलाशहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कोणतीही शहानिशा करता अमानुषपणे मारहाण केली. माझ्या शरीरावर त्याचे व्रण अजूनही दिसत आहेत. त्यामुळे आधी मेडिकल करा अन् नंतरच मला कारागृहात नेण्यात यावे, असे सम्राट सुरवाडे याने सांगितले.