आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉडीगार्डच्या पिस्तुलातून अनवधानाने सुटली गोळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांचा सुरक्षारक्षकाच्या पिस्तुलातून अनावधानाने गोळी सुटली. सुदैवाने ही गोळी कुणालाही लागता भिंतीवर जाऊन आदळली. ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजता पोलिस मुख्यालयातील शस्त्रागारात घडली.

लग्न म्हटले की घाई आलीच. घाईघाईत काय होईल सांगता येत नाही. अशीच घटना आज पोलिस जवानाच्या हातून घडली. अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांचा सुरक्षा रक्षक कैलास चौधरी यांचे लग्न ठरले. त्यासाठी त्यांनी रजा घेतली. रजेवर जाण्यापूर्वी त्यांच्याकडे असलेले पिस्तूल हे त्यांना परत करणे आवश्यक होते. त्यानुसार कैलास चौधरी रविवारी दुपारी पोलिस मुख्यालयातील शस्त्रागारात पिस्तूल परत करण्यासाठी गेले. या वेळी त्यांच्याजवळ असलेले एसएनएचपी १० राउंड असलेले पिस्तूल ते शस्त्रागारातील स्टोअरकीपर गजानन ढोरे यांना परत देत होते. मात्र, ते गोळ्या ठेवण्याचे मॅग्झिन्स काढत असताना त्यातून शेवटची गोळी निघत नव्हती. या वेळी त्यांनी जोर देऊन पाहिले. मात्र, ते निघाल्यामुळे गजानन ढोरे यांनी ते काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी कैलास चौधरी यांच्याकडून पिस्तूलची दिशा बदलल्याने अचानक पिस्तुलातून गोळी सुटली. ही गोळी भिंतीवर जाऊन आदळली. कुणालाही गोळी लागल्यामुळे जीवितहानी टळली. अनावधानाने पिस्तूलमधून गोळी सुटल्याची नोंद सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात घेतली.

पिस्तुलांत होते १० राउंड
एसएनएचपी पिस्तुलांत १० राउंड असतात. शेवटचा राउंड निघत नसल्यामुळे ताकदीचा वापर करण्यात आला. या वेळी त्यांच्या हातातील पिस्तूल पडले आणि फायरिंग झाले. पिस्तूलच्या फायरिंगच्या आवाजाने पोलिस मुख्यालयात धावपळ उडाली होती. मात्र, नंतर अनावधानाने गोळी सुटल्याचे समोर आले.

चौकशी होईल
गोळी कशी सुटली, त्यात काही निष्काळजीपणा झाला काय, याची चौकशी करण्यात येणार आहे. घटनेत मात्र जीवितहानी झाली नाही.'' निकेशखाटमोडे पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक