आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी पोलिसांनी हेल्मेट वापरावे, नंतर सांगावे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण, अशी अवस्था पोलिस खात्याची होऊ नये, म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हा पोलिस दलातील जवानांना हेल्मेट वापरण्याच्या सूचना दिल्या. या सूचना वजा आदेशाला एक महनिा झाला. मात्र, हा आदेश पोलिसांच्या पचनी पडला नाही. तसेच ठाणेदारसुद्धा पोलिस ठाण्याच्या भिंतीवर हा आदेश चिपकवून मोकळे झाले. शहरात वा जिल्ह्यात बक्षिसाला पात्र असा एकही हेल्मेट वापरणारा पोलिस सापडत नाही. याचा अर्थ म्हणजे, पोलिस अधीक्षकांच्या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येते.

अपघात झाल्यानंतर गंभीर इजा होऊ नये, यासाठी गेल्या काही वर्षांपूर्वी दुचाकीधारकास हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती. स्वत:ची सुरक्षा स्वत: घेतली, तर बिघडले कुठे, असे म्हणून अनेक जण हेल्मेटचा वापर करू लागले. मात्र, काही दविसांनी वनिाहेल्मेटधारकांना पोलिसांच्या दंडाची भीती नसल्यामुळे "येरे माझ्या मागल्या' अशी परिस्थिती निर्माण झाली. कायदा हा सर्वांसाठी आहे, सर्वांकडून त्याचे पालन झालेच पाहिजे, या हेतूने जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांना वाटले की, आधी पोलिसांनी हेल्मेट वापरून समाजात आदर्श निर्माण करावा. पोलिस हेल्मेट वापरू लागले, तर वाहनधारकही हेल्मेट वापरतील, असा आशावाद मीणा यांना आहे. त्याच धर्तीवर त्यांनी ऑक्टोबर रोजी पोलिसांनी हेल्मेट वापरावे, असे आदेशवजा पत्र काढले. हे पत्र अनेक ठाण्यांमध्ये ठाणेदारांनी भिंतीवर चिपकवले. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही.

पोलिसांना सक्ती तर नाहीच : पोलिसांचेजीवनच धावपळीचे त्यात हेल्मेटचा अतिरिक्त सांभाळ कसा करतील, याचा विचार करूनच पोलिस अधीक्षकांनी हेल्मेट वापराच्या सूचना दिल्या. सक्ती तर केलीच नाही. त्यामुळे निदान ज्यांना शक्य होईल, त्यांनी तरी हेल्मेट वापरून पोलिस अधीक्षकांच्या सूचनेचे पालन करायला का नको होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठाणेदारांनीच घेतले नाही मनावर : ठाणेदाराच्यासूचना या पोलिस कर्मचाऱ्यासांठी आदेश असतात. पोलिस खात्यात शिस्तीला मोठे महत्त्व आहे. मात्र, ठाणेदारांनी पोलिस अधीक्षकांनी केलेल्या हेल्मेट वापराबाबतच्या सूचना पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या असत्या, तर काही प्रमाणात का होईना, शहरांमध्ये हेल्मेट घातलेले पोलिस दिसले असते. मात्र, ठाणेदारांनी पोलिस अधीक्षकांचा आदेश मनावर घेतला नाही.