आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Drill Attraction For People Issue At Akola

पोलिसांच्या ‘सरावा’ने वेधले लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार, स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांचे रविवारी सकाळी 11.15 वाजता अकोल्यात जाहीर सभेसाठी आगमन होणार आहे.शिवणी विमानतळावरून अकोला क्रिकेट क्लब येथील सभास्थळी ते मोटारीने येणार आहेत. त्यादरम्यान बंदोबस्त कसा असेल, त्याची रंगीत तालीम पोलिसांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता केली. या रंगीत तालमीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. अकोला पोलिसांनी नरेंद्र मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. मोदींच्या आगमनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आज शिवणी विमानतळ ते अकोला क्रिकेट क्लब मैदान दरम्यानच्या सात किलोमीटर अंतरावर पोलिसांनी बंदोबस्ताचे प्रात्यक्षिक घेतले.
या वेळी प्रत्येक चौकात पोलिसांचा ताफा तैनात होता. पोलिस वाहने सुसाट आल्यानंतर रस्त्यांची वाहतूक बंद करण्यात आली. सभास्थळीसुद्धा बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांचे प्रात्यक्षिक जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.