आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना शिस्त; रात्रभर चालते गस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काही महिन्यांपूर्वी शहरात पोलिसिंग आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, काही दिवसांपासून शहरामध्ये पोलिसिंग असल्याचे दिसून येत आहे. गत महिनाभरापासून शहरात पेट्रोलिंग होत आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या गस्तीसाठी प्रत्येक ठाणेदाराला आठवड्यातील एक दिवस गस्त अधिकारी म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून रात्रीच्या चोरीच्या प्रमाणात घट झाली आहे.

पोलिसांचा धाक राहावा, यासाठी पेट्रोलिंग महत्त्वाचे आहे. दिवसाची आणि रात्रीची पेट्रोिलंग ही नियमानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यातून होत असते. मात्र, तिची अंमलबजावणी पोलिसांकडून होत नसल्यामुळे पेट्रोलिंग कागदावरच राहते. कागदोपत्री ड्यूटी चालू आहे, असे दर्शवल्या जाते. यापुढे असे चालणार नसून, प्रत्येक पोलिसाने आपले कर्तव्य चोख बजावावे, यासाठी जिल्‍हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस दलाला कर्तव्यात कसूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रामाणिकपणे पोलिस रात्रीची गस्त घालत आहेत. परिणामस्वरूप रात्रीच्या चोरी, प्राणघातक हल्ले आदींच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येत असले तरी दिवसांच्या लुटमारीच्या घटना मात्र घडताना दिसून येत आहेत. त्यावर जिल्हा पोलिस यंत्रणेकडून उपाययोजनेची आवश्यकता आहे.

सातठाणेदार सात दिवसांचे गस्त अधिकारी :
शहरामध्येसात पोलिस ठाणे आहेत. या सात पोलिस ठाण्यांच्या ठाणेदारांना रात्रीचे गस्त अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. हे अधिकारी संपूर्ण शहरावर त्या रात्री लक्ष ठेवून असतात. संपूर्ण शहरभर गस्त देणे आणि प्रत्येेक पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व्यवस्थित कर्तव्य बजावत आहेत की नाहीत, तसेच त्यांना ठरवून दिलेल्या स्पॉटवर ते आहेत की नाहीत, याचा लेखाजोखा आणि अहवाल संबंधित ठाणेदारांना पोलिस अधीक्षकांना सादर करणे अनिवार्य आहे. तसेच हे अधिकारीसुद्धा कर्तव्यावर आहेत की नाहीत, त्यासाठी प्रत्येक दोन तासानंतर त्यांचेसुद्धा लोकेशन घेण्यात येत आहे. हे अधिकारी रात्री ११ ते सकाळी वाजेपर्यंत गस्तीवर राहतात.

हजेरीलावून घरी झोपणारे कर्मचारी परेशान :
दुसऱ्यापोलिस ठाण्याच्या हद्दीतील रात्रीच्या गस्तीचे पोलिस कर्मचारी ड्यूटीवर आहेत की नाहीत, ते तपासण्यासाठी गस्त अधिकारी त्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कुठल्याही स्पॉटवर बोलावतो. त्यानंतर काही िमनिटात पोलिस कर्मचाऱ्यांनी स्पॉटवर हजर होणे आवश्यक आहे. केव्हाही कुठेही बोलावणे होऊ शकते म्हणून झोपाळू पोलिस कर्मचारी परेशान झाले आहेत. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे. सर्व पोलिस ठाण्यांच्या ठाणेदारांना रात्रगस्तीच्या दरम्यान कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत, असे जनसंपर्क अधिकारी, बी. पी. घुगे यांनी सांगितले.

रात्री एक नंतर प्रत्येकाची चौकशी करतो
*रात्री१२ वाजता चित्रपट सुटल्यानंतर नागरिकांची ये-जा समजू शकतो. मात्र, त्यानंतर फिरणाऱ्याला संशयित आहे, त्या उद्देशाने आम्ही चौकशी करतो. सर्व पोलिस कर्मचारीसुद्धा अलर्ट असतात. -डब्ल्यू. एस.खिल्‍लारे, ठाणेदारजुने शहर

घरफोडीच्या घटना कमी
*रात्रीच्यागस्तीदरम्यान संवेदनशील ठिकाणांना आम्ही भेटी देतो. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार प्रभावीपणे गस्तीची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणून शहरात होणाऱ्या रात्रीच्या घरफोडीच्या घटना कमी झालेल्या दिसून येतात. या गस्तीचा फायदा होत आहे. सुधाकरदेशमुख, ठाणेदार,रामदासपेठ

कामचुकारांना थारा नाही
*रात्रगस्तीच्यानावावर अनेक जण फिरत नाहीत, आम्ही ज्या ठिकाणी गस्तीवर जातो, त्या ठिकाणी त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्याला तेथे बोलावतो. अपेक्षित वेळेत तो तेथे येणे आवश्यक आहे. तेव्हाच तो ड्यूटीवर आहे हे समजते. त्यामुळे कामचुकारांना आता थारा नाही. प्रकाशसावकार, ठाणेदार,सिव्हिल लाइन्स.
प्रकाश सावकार, ठाणेदार,सिव्हिल लाइन्स
अनिरुद्ध अढाव, ठाणेदार,सिटी कोतवाली
सी. टी. इंगळे, ठाणेदार,खदान
प्रकाश निंघोट, ठाणेदार,अकोटफैल
भारत राक्षसकार, ठाणेदार,डाबकी रोड
डब्ल्यू. एस. खिल्लारे, ठाणेदारजुने शहर
सुधाकर देशमुख, ठाणेदार,रामदासपेठ
गस्त अधिकाऱ्याची ड्यूटी अशी
जिल्‍हाविशेष शाखा, पोलिस नियंत्रण कक्षातील प्रत्येकी दोन कर्मचारी आणि संबंधित ठाण्यातील कर्मचारी गस्त अधिकाऱ्यांसोबत गस्तीवर राहतात. ते गस्तीदरम्यान पोलिस ठाण्याच्या फस्ट, सेकंड, थर्ड व्हॅनला चेक करतात. मालमत्तेचा गुन्हा घडल्यास तत्काळ भेट देणे, गुड मॉर्निंग सर्चिंगचे पर्यवेक्षण करणे आणि सर्व पोलिस ठाण्याला भेट देतात.