आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् पोलिसांनी तासांत लावला हरवलेल्या विद्यार्थ्याचा शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बाभुळगाव जहागीर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ११ व्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी सोमवारी सकाळपासून बेपत्ता झाला होता. प्राचार्यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध सोमवारी सकाळी १० वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मुलाची शोधाशोध सुरू केली. त्यासाठी पोलिसाची एक टीम शोधासाठी रवाना झाली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे अवघ्या तासांत पोलिसांनी मुलाला शोधून काढले. या मुलाला पोलिसांनी भुसावळ रेल्वेस्थानकावरून सोमवारी, रात्री वाजता ताब्यात घेतले.

हा विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ११ वी विज्ञान शाखेत शिकत आहे. या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांनी १८ जानेवारी रोजी नवोदय विद्यालयातील वसतिगृहात सोडून दिले होते. त्यानंतर रात्री ११ ते सकाळी ५.३० वाजेपर्यंत तो कुणालाही दिसला नाही. सकाळी कवायतींसाठी सर्व मुले जमा झाली. मात्र, हा विद्यार्थी दिसून आला नाही. त्यामुळे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य राम अवतार तपेश्वरसिंग यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात कोणी तरी अज्ञात व्यक्तीने विद्यार्थ्याला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. डी. ढाकणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक मुकुंदसिंग वाघमोडे यांच्या नेतृत्वात चमू बनवली. त्यांनी लगेच मुलाचे लोकेशन घेतले. तो आधी मलकापूरला असल्याचे लोकेशन मिळाले. त्यानंतर पोलिस मलकापूरला पोहोचले. त्यानंतर हा मुलगा भुसावळ टेकडी येथे फिरत असल्याचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिस आणि शिक्षकांनी या मुलाच्या शोधार्थ भुसावळ येथे मोर्चा वळवला. त्याआधीच या मुलाला भुसावळ रेल्वेस्थानकावरून रात्री वाजता ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या शिक्षकाच्या ताब्यात देण्यात आले होते. ही मोहीम सहायक पोलिस निरीक्षक वाघमोडे यांच्या नेतृत्वात फत्ते करण्यात आली.