आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांचे ‘एकमेका साहाय्य करू’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - वार्षिक निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर जुने शहर पोलिस ठाण्यात सोमवारी 12 ऑगस्टला कर्मचार्‍यांचा कायद्याचा पेपर घेण्यात आला. ही परीक्षा खेळीमेळीच्या वातावरणात झाली आणि पोलिसांनी ‘एकमेका साहाय्य करू..’ ही उक्ती प्रत्यक्षात कृतीत आणून दाखवली.

दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले पोलिस कर्मचारी या परीक्षेत सहभागी झाले होते. त्यामुळे ‘परीक्षे’त उत्तीर्ण होण्यासाठी कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांनीही सहकार्य केले. सर्वांनी प्रश्न-उत्तरांची देवाणघेवाणही केली गेली. पोलिस दादांनी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून पेपर सोडवला. हा पेपर घेण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातील चमू पोलिस ठाण्यात हजर होती.त्यामुळे सर्वांनी या परिक्षेचा आनंद घेतला. मात्र, ज्या उद्देशाने पेपर घेण्यात आला. तो उद्देश खरच साध्य झाला का ? हा प्रश्‍नच आहे.


काय असते निरीक्षण
पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक पोलिस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण करतात. या वेळी दाखल गुन्हे, उघडकीस आलेले गुन्हे, आरोपीसह पोलिस ठाण्याच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेण्यात येतो.


दृष्टिक्षेप ‘परीक्षेवर’
पोलिसांना कायद्याचा अभ्यास किती आहे, याची माहिती व्हावी यासाठी 50 गुणांचा कायद्याचा पेपर घेण्यात येतो. 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांना परीक्षेत सहभागी करून घेण्यात येते. त्याचे ज्ञान तपासण्यासाठी ही परिक्षा घेण्यात येते.


पेपरमधील प्रश्न वेगवेगळे होते
वार्षिक निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर कायद्याचा पेपर घेण्यात आला. पोलिसांना कायद्याचे ज्ञान किती आहे, हे यातून लक्षात येईल. यावेळी घेण्यात आलेल्या पेपरमधील प्रश्न वेगवेगळे होते. नंदकिशोर शर्मा, ठाणेदार, जुने शहर पोलिस ठाणे.