आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोदयच्या मुलींची अधिका-यांनी केली चौकशी, आरोपींना मदत करणारा युवक गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जवाहर नवोदय विद्यालयात ४९ मुलींसोबत अभद्र व्यवहार केल्याप्रकरणी रविवारी महिला पोलिस अधिका-यांच्या चौकशी समितीने विद्यालयात जाऊन मुलींचे बयाण नोंदवले. तर अटक केलेल्या दोन आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर आरोपींना मदत करणा-या नागपूर येथील युवकास पोलिसांनी गजाआड केले असून, त्यालाही या प्रकरणात चौथा आरोपी केले आहेेे.
शिक्षक राजन गजभिये शैलेश रामटेके यांनी ४९ मुलींचा विनयभंग केला, अशी तक्रार प्राचार्यांनी पोलिसांत केली होती. फरार आरोपींना नागपूर येथून शुक्रवारी अटक केली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, या दोघांनीही पोलिसांवर मारहाणीचे आरोप केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांची वैद्यकीय चौकशी करण्याचे आदेश देऊन त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. या दोघांचीही वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुन्हा त्यांना रविवारी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांचा मारहाणीचा दावा फेटाळत त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मदत करणा-याला केले आरोपी : आरोपीफरार असताना त्यांना मदत केली म्हणून पोलिसांनी मंगेश तुकाराम मुंगतवार याला शनिवारी रात्री नागपुरातून अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्यालासुद्धा १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोपी गजभिये आणि रामटेके यांना मदत करणे मंगेशला महागात पडले आहे.

बयाणाचा सिलसिला सुरूच : विद्यालयातीलमुलींच्या बयाणाचा सिलसिला चौथ्या दिवशीही सुरूच होता. सहायक पोलिस निरीक्षक ज्योती भारमल यांच्या चौकशी समितीने रविवारी विद्यालयातील मुलींचे बयाण घेतले. सोमवारीही मुलींचे बयाण नोंदवण्यात येणार अाहे.

प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता
मुलींच्याविनयभंग प्रकरणात आरोपी रामटेके, गजभिये आणि संदीप लाडखेडकर हे पोलिस कोठडीत आहेत. यादरम्यान त्यांना मदत करणारे कोण कोण आहेत याची कसून चौकशी पोलिस करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.