आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पोलिसांची सलामी ‘धुळी’त..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - राजकीय नेत्यांना सलामी देण्याची वेळ.. अन् डोळय़ातच धूळ गेल्याने समोरचे दिसेनासे झाले. पोलिस कर्मचार्‍यांनी एका हातात बंदूक धरत दुसर्‍या हाताने डोळे झाकण्याचा प्रय} केला. पांढर्‍या शुभ्र कपड्यात आलेल्या राजकीय नेत्यांनाही धुळीचा सामना करावा लागला. शिवणी विमानतळावर विविध राजकीय पक्षांचे नेते हेलिकॉप्टरने पोहोचले. वेगात आलेल्या हेलिकॉप्टरने सोबत जणू वादळच आणले. त्यामुळे सलामी देण्याच्या तयारीत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना आधी धुळीलाच सलामी द्यावी लागली. नेत्यांनाही सुरुवातीला पोलिसांऐवजी धुळीची सलामी मिळाली. त्याचा त्रास पोलिसांनाही सहन करावा लागला.