आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खदान परिसरात पोलिसांचा छापा; तलवारी, जंबिया, चाकू केले जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- खदानपरिसरात युसूफ अलीच्या घरामध्ये पोलिसांनी छापा टाकला. या वेळी घरामधून १२ तलवारी, फायटर, जंबिया आणि चाकू ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई खदान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री वाजताच्या सुमारास केली.

गणेश उत्सवादरम्यान, संपूर्ण शहरात कायदा सुव्यवस्था अबािधत ठेवण्याच्या दृष्टीने आज खदान पोलिसांनी मोहीम राबवली. उमरसिंग प्रेमसिंग बावरी हा त्याच्या घरामध्ये अवैधपणे शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोिलसांनी या घरावर पाळत ठेवली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री वाजताच्या सुमारास पोिलसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी त्यांनी उमरसिंग बावरी याच्या घरातील पलंगाखाली लोखंडी पेटी असल्याचे दिसून आले. त्यांनी पेटी उघडून पाहिली असता वास्तव समोर आले. आरोपी उमरसिंग बावरी याला अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार सी. टी. इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस काॅन्स्टेबल अनिल धनभर, अजय गाडगे, किशोर सोनोने, सागर भारस्कर, मुमताज पठाण यांनी केली. रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी आरोपींची कसून चौकशी केली.

सागरभारस्कर अनिल धनभर होते लक्ष ठेवून : पोलिस कॉन्स्टेबल सागर भारस्कर अनिल धनभर यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून ते उमरसिंग बावरी याच्या घरावर पाळत ठेवून होते. त्याच्या घरामध्ये शस्त्रे लपवून ठेवल्याच्या माहितीची खात्री झाल्यानंतर त्यांनी नियोजनबद्धरीत्या छापा टाकून आरोपीलासुद्धा जेरबंद केले.
पोलिसांनी जप्त केलेल्या तलवारी, फायटर, जंबिया चाकू.

नांदेडहून आणल्या तलवारी
नांदेडहूनतलवारी आणल्या आहेत. आमच्या धर्मामध्ये शस्त्रांना महत्त्व आहे. तसेच ट्रकवाले आमच्याकडून शस्त्रे घेऊन जातात, फायटर मुलांना खेळण्यासाठी आणल्याची माहिती आरोपी उमरसिंग बावरी यांनी दिली. पोलिसांनी त्याच्या मुलालाही ताब्यात घेतले.