आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस भरतीची अंतिम यादी जाहीर280 उमेदवार भरतीत उत्तीर्ण; संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा पोलिस भरतीसाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल रविवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आला. यातून मेरिटनुसार 280 उमेदवार पोलिस भरतीत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नावाची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

6 जून ते 19 जूनपर्यंत जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. 22 जून रोजी पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. 3 हजार 824 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल त्याच दिवशी लगेच रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. 248 रिक्त असलेल्या जागांसाठीची जाहिरात सुरुवातीला प्रसिद्ध करण्यात आली होती. नंतर पदांच्या संख्येत वाढ करण्यात आल्यामुळे 280 उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या नावांची यादी पोलिस मुख्यालयात लावण्यात आली आहे तसेच ही यादी (www.akolapolice.gov.in) या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(संग्रहीत छायाचित्र)