आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप; 329 जणांविरुद्ध केली प्रतिबंधक कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - धार्मिक उत्सवांमध्ये असामाजिक तत्त्वांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 9 सप्टेंबरपर्यंत शहरातील 329 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली.

अकोला हा गृहविभागाच्या लेखी अतिसंवेदनशील जिल्हा असल्याची नोंद आहे. अशातच सध्या धार्मिक उत्सवांचे दिवस असल्याने पोलिसांनी शहरातील पोलिस बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. धार्मिक उत्सव शांततेने होण्यासाठी पोलिस दरवर्षी गुंडप्रवृत्तीच्या युवकांवर कारवाई करतात. यंदाही पोलिसांनी धार्मिक उत्सवांना गालबोट लावण्याची शक्यता असलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

दृष्टिक्षेप कारवाईवर..
कलम संख्या
110 (सीआरपीसी) 66
107 226
दारूबंदी अधिनियम 37

180 जणांना बजावल्या नोटीस
पोलिसांनी सीआरपीसीचे कलम 149 (गुन्हा करण्यापासून प्रवृत्त करणे) अन्वये 125 जणांना नोटिसेस बजावल्या आहेत तसेच सीआरपीसीचे कलम 144 (बाहेरील व्यक्तीने पोलिस ठाण्याच्या हद्दीत येऊन शांतता भंग करू नये अथवा त्या व्यक्तीने आहे तेथेच राहावे) अन्वये 55 जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असे सुत्रांनी सांगितले.