आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांना मारहाणप्रकरणी 11 आरोपींना पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांढरकवडा - तालुक्यातील मोहदा (तांडा) येथील गावठी दारूभट्टी सुरू असलेल्या ठिकाणी छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या ताफ्यावर दगडफेक करून दोन पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत दोन पोलिस गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्या ठिकाणी मोठी पोलिस कुमक पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, दगडफेक करणार्‍या महिला आणि पुरुष पसार झाले होते. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यात सहभागी असलेल्या 11 आरोपींना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. दरम्यान सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 2७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यात भवरू फकरू जाधव वय 40 वर्षे, बाबाराव मानसिंग राठोड वय 3९ वर्षे, राजू चव्हाण वय 3९ वर्षे, रमेश जाधव वय 22 वर्षे, पुरूषोत्तम दशरथ पोहरकर वय 41 वर्षे, वसंता पवार वय 20 वर्षे, शंकर मानसिंग राठोड वय 41 वर्षे, तुळशिराम गुलाब चव्हाण वय 43 वर्षे, नीलेश किसन पवार वय 21 वर्षे, अतिश रंगराव राठोड वय 25 वर्षे, लक्ष्मण किसन पवार वय 40 वर्षे सर्व रा. मोहदा (तांडा) यांचा समावेश आहे.

या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या सर्व आरोपींना 2७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता पांढरकवडा पोलिस उर्वरित आरोपींचा कसून शोध घेत आहेत.