आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोचालकावर पोलिसांची दबंगगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विनामीटरसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ऑटोरिक्षाचालकांवर शुक्रवारी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत 91 चालकांविरोधात कारवाई केली. ऑटोरिक्षाचालकांचा मनमानी कारभार आणि प्रवाशांच्या होत असलेल्या लुटीला ‘दिव्य मराठी’ने वाचा फोडल्यानंतर पोलिसांनीही कडक कारवाई करत दबंगगिरी दाखवली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या नोंदीनुसार अकोला शहरात दोन हजार 196 ऑटोरिक्षा आहेत. नोंदणीच्या वेळी (पासिंग करताना) ऑटोरिक्षांना मीटर लावले जातात. मात्र, प्रवाशांची वाहतूक करताना मीटर काढून मनमानीपणे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे प्रवाशांना सरासरी 20 टक्के जादा प्रवासभाडे मोजावे लागते. याची गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. लाकडी पट्टयाही जप्त करण्यात आल्या.

वाहतूक शाखेने दिली समज
शहर वाहतूक शाखेने नेहरू पार्क, मदनलाल धिंग्रा चौकात कारवाईची मोहीम राबवली. वाहतूक निरीक्षक एस. एस. ठाकूर यांनी कर्मचार्‍यांसह ही मोहीम राबवली. या वेळी काही ऑटोरिक्षाचालकांना मीटर बसवून घेण्याबाबत समजही देण्यात आली.