आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाची महिलेला शिवीगाळ, मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बोरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचा-यांनी एका महिलेला शिवीगाळ केली अमानुषपणे मारहाण केली. ही घटना बोरगावमंजू पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या दापुरा-मजलापूर येथे गत आठवड्यात घडली होती. महिलेच्या घरात दारू विकताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याबाबतचा एक व्हिडिओ व्हॉटस्अॅपवर शेअर होत आहे.
बोरगावमंजू पोलिस दापुरा-मजलापूर येथे पेट्रोलिंगला गेले होते. या गावात संगीता भगणे या महिलेच्या घरात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्या महिलेच्या घरात पोलिसांनी छापा टाकला होता. या वेळी महिलेला पोलिसांनी धक्के मारून, अश्लील शिवीगाळ केली होती. कारवाई करताना महिला पोलिस आरोपी महिलेचा हात पकडून तिला नेत आहे, तर पोलिस कॉन्स्टेबल अरुण गावंडे त्या महिलेला अश्लील शिवीगाळ करत होता आणि तिला काठीने आणि लाेटपाट करून मारहाण करत होता. त्याच्यासोबत एक महिला पोलिस आणि पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील हेसुद्धा होते.

बोरगावपोलिस वादाच्याच भोव-यात
महिलेनेगुन्हा केला असेल, तर तिला अटकाव आणि तिच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस दलात महिला पोलिस आहेत. त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. मात्र, पोलिस कर्मचा-याने गुंडासारखे वागून अश्लील शिवीगाळ करणे म्हणजे पोलिसांची दादागिरीच म्हणावी लागेल. यापूर्वीही बोरगाव पोलिसांच्या विरोधात उपोषणे झाली आहेत. मात्र, त्याचा बोरगाव पोलिसांना काही फरक पडलेला दिसत नाही.

गुन्हेगारीचे समर्थन नाही
गुन्हेगारीचेसमर्थन करता येणार नाही. मात्र, पुरुष कर्मचा-याने केलेला अश्लील भाषेचा वापर आणि धक्काबुक्की हे निषेधार्ह आहे. अशा पोलिस कर्मचा-यावर कारवाई झाली पाहिजे.'' आशामिरगे, सदस्या,राज्य महिला आयोग

महिलेने पोलिसांवर दगडफेक केली होती
ज्यामहिलेवर पोलिसांनी कारवाई केली. त्या महिलेने आणि तिच्या मुलीने पोलिसांना दगड फेकून मारले होते. त्यामुळे महिलेला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला होता. घटना मात्र जुनी आहे.'' डी.के. अव्हाळे, ठाणेदारबोरगाव