आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एमआयएम’च्या उभारणीकडे पोलिसांचे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - हैदराबाद येथील मज्जलिस ए इत्तेहादूल अल मुसलमिन अर्थात एमआयएम या राजकीय पक्षाच्या अकोल्यात होणार्‍या उभारणीकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. पोलिस या पक्षाचे संभाव्य पदाधिकारी, सदस्य, पक्ष कार्यालयाबाबत माहिती संकलीत करीत आहेत. एमआयएमचे आमदार अकरोबुद्दिन ओवेसी यांचे अकोल्यात ईदची शुभेच्छा देणारे फ्लेक्स बोर्ड झळकल्यामुळे पक्ष बांधणीचे संकेत प्राप्त झाले आहेत.

एमआयएमने आता विदर्भात पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. अकोल्यातही पक्ष विस्तार होणार आहे. अशातच एमआयएमची आक्रमक कार्यपद्धती आणि धार्मिक उत्सवांचे दिवस लक्षात घेता पोलिस प्रशासनही कामाला लागले आहे.

सदस्य नोंदणीला प्रारंभ
एमआयएमने अकोल्यात सदस्य नोंदणीला प्रारंभ केला आहे. दोन महिन्यांपूर्वी अकोल्यातील काही कार्यकर्त्यांनी एमआयएमच्या नेत्यांची भेट घेतली होती. सदस्य नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पक्षाचे नेते येथे येणार आहेत. सदस्यांशी चर्चा केल्यानंतर कार्यकारीणी जाहिर होईल.