आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोला मिळणार आता पोलिसांचे नंबर, अवैध ऑटोचीही मिळणार माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरातील अवैध ऑटोची घुसघोरी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ऑटोला नंबर देण्याची योजना आखली आहे. ऑटोमध्ये आणि ऑटोबाहेर हे नंबर लावल्या जाणार असून, त्या ऑटोची हिस्ट्री पोलिस प्रशासनाकडे राहणार आहे. त्यामुळे एखाद्या ऑटोमध्ये सामान विसरल्यास ऑटोचा तत्काळ शोध घेणे सोपे जाणार आहे. हा उपक्रम लगेच सुरू होणार असल्याची माहिती शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
ऑटोमध्ये सामान विसरण्याच्या अनेक घटना घडतात. मात्र, सामान ठेवलेल्या आॅटोचा नंबर आठवत नसल्यामुळे ना आॅटोचा थांगपत्ता लागत, ना विसरलेल्या सामानाचा. त्यावर उपाय म्हणून शहर पोिलस अधीक्षक कार्यालयाने टोला नंबर देण्याची योजना बनवली अाहे. शहर वाहतूक शाखा हे नंबर प्रत्येक टोला विनामूल्य देणार आहेत. प्रवाशांना दिसेल असा नंबर लावण्यात येईल. ऑटोत बसल्यावर प्रवाशाला हा नंबर लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर कुठलीही अनुचित घटना घडल्यास पोलिसांशी संपर्क केल्यास त्या ऑटोची हिस्ट्री वाहतूक पोिलसांकडे राहणार असल्यामुळे तत्काळ ऑटोचा शोध घेता येणार आहे. तसेच हाच नंबर ऑटोचालकाला ऑटोच्या पाठीमागे मोठ्या अाकड्यात लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. असे नंबर लावल्यामुळे शहरातील ऑटो आणि ग्रामीण भागातील ऑटोची ओळख पटणार आहे. सध्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये विनापरवाना आणि ग्रामीण भागातील ऑटो धावतात. या ऑटोमुळे शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अवैध ऑटो पकडण्यात पोिलसांना मदत होणार आहे.
सुरुवातीला चार हजार नंबर तयार; आजपासून सुरू होणार मोहीम
पोिलसप्रशासनाने चार हजार नंबर तयार केले आहेत. या नंबरवर वाहतूक पोिलसांचे चिन्ह राहणार असून, खालच्या दिशेने शहर पोिलस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची सही राहणार आहे. मंगळवारपासून ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्यामुळे पोिलसांची ही योजना प्रवासी आणि पोलिस दोघांचेही हित लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे.