आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांकडे आज पाठवणार प्रस्ताव , राजपत्र प्रसिद्ध झाल्यामुळे कार्यक्रम पडला लाबंणीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापौरपदखुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. आरक्षणाबाबतचे इतिवृत्त शासनाकडून प्राप्त झाल्याने महापौर पदाच्या निवडणुकीबाबत अमरावती विभागीय आयुक्तांना ३० ऑगस्टला महापालिका प्रस्ताव पाठवणार आहे.

महापौर पदाची मुदत संपत येण्यास काही दिवस राहिले असताना महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण सोडतीचे वृत्तही प्रकाशित झाले होते. मात्र, राजपत्र प्रसिद्ध झाल्यामुळे निवडणूक कार्यक्रम लाबंणीवर पडला आहे. महापौर आरक्षण सोडतीचे इतिवृत्त काही महापािलकांना प्राप्त झाले, तर काही महापालिकांना प्राप्त झाले नाही, तर नाशिक महापािलकेतील नगरसचिवांनी महापौर आरक्षणाचे राजपत्र मिळाले नसल्याचे सांगून राजपत्र प्रसिद्ध झाल्यावर विभागीय आयुक्तांकडे तसा प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इतिवृत्ताला राजपत्र म्हणायचे की, महापौर आरक्षणाचे राजपत्र वेगळे? याबाबत विविध महापालिकांच्या नगरसचिवांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

अकोला महापािलकेनेही अद्याप महापौर निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती विभागीय आयुक्तांकडे तसा प्रस्ताव पाठवलेला नाही. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांना निवडणुकीच्या तारखेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अकोला महापािलकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु, महापौर पदाच्या निवडणुकीबाबत कोणतीही हालचाल िदसत नसल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.

शनिवारी प्रस्ताव पाठवणार
महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त अकोला महापािलकेला प्राप्त झाले आहे. इतिवृत्त प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांशी चर्चा झाली. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीबाबत अमरावती विभागीय आयुक्तांकडे ३० ऑगस्टला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. '' अनिलबिडवे, प्रभारीनगर सचिव, महापालिका, अकोला.
महापौर-उपमहापौर निवडणूक