आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Narayan Gavyankar Nominations To Be Back Issue At Akola

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्‍याशी चर्चा केल्‍यानंतर गव्हाणकरांनी घेतली माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- काँग्रेस नेते नारायण गव्हाणकर यांनी दाखल केलेला अपक्ष अर्ज आज दुपारी 12.25 वाजता मागे घेतला. मंगळवार रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर गव्हाणकर यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. आज अकोल्याचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासोबत बाबासाहेब धाबेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अर्ज मागे घेताना त्यांच्यासोबत काँग्रेसचे लोकसभा उमेदवार व जिल्हाध्यक्ष हिदायतपटेल, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर गणगणे, माजी आमदार बबनराव चौधरी, अँड.नातिकोद्दीन खतीब, दादाराव मते, महेंद्रसिंग सलुजा, दीपक माने व गव्हाणकर यांची मुले या वेळी उपस्थित होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नारायण गव्हाणकर यांनी उमेदवारी मागे घेतली.

त्यांच्या या राजकीय चालीने त्यांना काँग्रेसच्या पक्षर्शेष्ठींनी काय आश्वासन दिले याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने त्यांना अकोला पूर्व किंवा बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. नारायण गव्हाणकर यांचा अर्ज मागे घेताना काँग्रेस नेत्यांनी पक्षहिताचा निर्णय घेतला, अशी चर्चा काँग्रेस गोटात होती. पण, अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत काँग्रेसचा अंतिमत: किती फायदा होतो की तोटा हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.आज दुपारी 12.15 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नारायण गव्हाणकर यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे नाराजी दिसत होती. पण, पक्ष नेतृत्वाने सांगितल्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर हिदायत पटेल यांनी गव्हाणकर यांना घट्ट मिठी मारली. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे काही सर्मथक व गव्हाणकर यांची तीन मुले राम, मुकेश, नितीन यांची उपस्थिती होती..

लोकसभा पहिले
गव्हाणकर यांना उमेदवारी मागे घेताना काँग्रेसने कुठेच आश्वासन दिले नाही. लोकसभा निवडणुकीत उमेदवारासाठी काम करण्याचा आदेश त्यांना देण्यात आला आहे. लोकसभा उमेदवार विजयी करणे आमचे लक्ष्य आहे. सुधाकर गणगणे, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस.

मैं हू ना : काँग्रेसने गव्हाणकर यांना काय आश्वासन दिले, अशी विचारणा जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांना केली असता, त्यांनी मैं हू ना असे म्हणत त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

मी काँग्रेसमध्ये गेलो त्यामुळे काँग्रेस पक्ष नेतृत्व जो आदेश देईल तो पाळत आहे. कुठलेही आश्वासन पक्षाने दिले नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा आणि पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी लढणार आहे. नाराज नाही. नारायण गव्हाणकर, माजी आमदार.

अँड.नातिकोद्दीन खतीब व नारायण गव्हाणकर यांनी काँग्रेससाठी बाळापूर मतदारसंघात जोरदार काम सुरू करा. लोकसभा निवडणुकीत हे मतदारसंघ पिंजून काढण्याची गरज आहे. बबनराव चौधरी, माजी आमदार